घरपालघरउन्हामुळे लिंबाचे दर तेजीत; भाजीपाला मात्र स्थिर

उन्हामुळे लिंबाचे दर तेजीत; भाजीपाला मात्र स्थिर

Subscribe

विशेष म्हणजे, मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी येत असल्याने काही दिवसातच आणखी भाव वाढेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

वाडा : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, लिंबू सध्या तेजीत आहे. कडधान्याची मागणी वाढल्याची स्थिती बाजारामध्ये दिसून येत आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे लिंबू तेजीत आहे. द्राक्ष शंभर रुपये किलो, तर कलिंगड 20 रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे. महिनाभरापूर्वी भाजीपाल्याचे दर कडाडले होते. कोबी, वांगी, भेंडी तेजीत होते. मात्र, त्यानंतर भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झाले सध्या हे भाव स्थिर आहेत. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. सध्या लिंबू तेजीत असून चिल्लर खरेदीमध्ये दहा रुपयांना एक किंवा दोनच लिंबू मिळत आहेत. विशेष म्हणजे, मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी येत असल्याने काही दिवसातच आणखी भाव वाढेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -