प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी (Ekadashi) म्हटले जाते. आज (14 जून) रोजी योगिनी एकादशीचे व्रत केले जाईल. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. योगिनी एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
योगिनी एकादशी तिथी
हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ कृष्ण एकादशी 13 जून रोजी सकाळी 9.28 वाजता सुरू होत असून ती 14 जून रोजी सकाळी 8.28 पर्यंत राहील. 14 जून 2023 रोजी योगिनी एकादशीचे व्रत केले जाईल.
योगिनी एकादशीचा उपाय
योगिनी एकादशीच्या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करावे. तसेच या दिवशी गजेंद्र मोक्षाचे पठण केल्याने पितरांना तृप्ती मिळते.
असं म्हणतात की, योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाचे झाड लावणे अत्यंत आवश्यक मानले जाते. हा उपाय केल्याने नोकरीत येणारे अडथळे दूर होतील. तसेच आर्थिक परिस्थितीही सुधारते.
योगिनी एकादशीच्या दिवशी भगवत गीतेच्या 11 व्या अध्यायाचे पठण करणं शुभ मानले जाते.
हेही वाचा :