घरभक्तीआज आमलकी एकादशीला भगवान विष्णूंना करा 'हे' फळ अर्पण; वाढेल सौभाग्य

आज आमलकी एकादशीला भगवान विष्णूंना करा ‘हे’ फळ अर्पण; वाढेल सौभाग्य

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हटले जाते. आज (3 मार्च) रोजी आमलकी एकादशीचे व्रत केले जाईल. आमलकी एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. आमलकी एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. या दिवशी श्री विष्णूंसोबतच शिव-पार्वतीची देखील पूजा केली जाते. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याशी संबंधित काही खास उपाय केल्याने कामात लवकर यश मिळते.

आमलकी एकादशी मुहूर्त

 

- Advertisement -

आमलकी एकादशी 3 मार्च 2023
एकादशी प्रारंभ : 2 मार्च रोजी सकाळी 6.39 वाजता
एकादशी समाप्त : 3 मार्च रोजी सकाळी 9:11 वाजता

सर्वार्थ सिद्धी योग – सकाळी 06:45 ते दुपारी 3:43 पर्यंत
सौभाग्य योग – सकाळपासून संध्याकाळी 6.45 पर्यंत

- Advertisement -

आमलकी एकादशीला करा आवळ्याचे उपाय

Amla (Indian Gooseberry) - Overview, History, Uses, Benefits, Precauti – Bhumija Lifesciences

 

  • या एकादशीला काही सोप्पे उपाय केल्यास व्यक्तीला सर्व संकटातून मुक्ती मिळते.
  • एकादशीच्या दिवशी कोणत्याही विष्णू किंवा शिव मंदिरात जाऊन दिवसभर उपवास करून नारायण, नारायण मंत्राचा सतत जप करा. असे केल्याने माणसावर आलेले मोठे संकटही टळते. या उपायाने अकालमृत्यू देखील टळतो.
  • आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी आवळ्याचे झाड लावल्याने व्यवसायात भरभराट होते आणि करिअरमध्ये प्रगती होते.
  • आमलकी एकादशीला 21 ताज्या पिवळ्या फुलांची हार करून भगवान विष्णूला अर्पण करा. भगवान विष्णूला पिवळी फुले खूप आवडतात. अशा वेळी ही फुले अर्पण केल्याने देव प्रसन्न होतात.
  • आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आवळा फळ भगवान विष्णूला अर्पण करा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हेही वाचा :

Holi 2023 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल कीर्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -