‘नासा’च्या नावे अनेकांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

‘नासा’च्या नावे अनेकांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

राज्यभरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या नावाने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ आणि राहुल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (financial fraud in pune by the name using nasa)

मिळालेल्या माहितीनुसार, रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यात कोट्यावधींना गंडा घालण्यात आला. याबाबत पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या बाबासाहेब रामहरी सोनवणे (50) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरोपींनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. तसेच यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. मात्र, कालंतराने या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

देशभरात अनेक ठिकाणी राईस पुलर या नावाने मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 100 हून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केले. आतापर्यंत 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.


हेही वाचा – गुवाहाटीच्या बंडावेळी श्री श्री रवीशंकर यांनी आशीर्वाद दिला; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची माहिती

First Published on: February 2, 2023 3:05 PM
Exit mobile version