घरताज्या घडामोडीगुवाहाटीच्या बंडावेळी श्री श्री रवीशंकर यांनी आशीर्वाद दिला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

गुवाहाटीच्या बंडावेळी श्री श्री रवीशंकर यांनी आशीर्वाद दिला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

गावांमध्ये पुनर्भरण विहिरी निर्माण करून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प राबवला जात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगची सह संस्था असलेल्या व्यक्‍ती विकास केंद्रामार्फत राज्यात हा प्रकल्प चालवला जात आहे. वाटूर येथे असलेल्या या जलतारा प्रकल्पाच्या जागेला आज आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी भेट दिली.

गावांमध्ये पुनर्भरण विहिरी निर्माण करून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प राबवला जात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगची सह संस्था असलेल्या व्यक्‍ती विकास केंद्रामार्फत राज्यात हा प्रकल्प चालवला जात आहे. वाटूर येथे असलेल्या या जलतारा प्रकल्पाच्या जागेला आज आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी भेट दिली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. (Sri Sri Ravi Shankar blessed during the Guwahati rebellion Information of Chief Minister Eknath Shinde)

“गुवाहाटीच्या बंडावेळी गुरुदेवांनी आशीर्वाद दिला होता, म्हणून आज कार्यक्रम होत आहेत. आपलं सरकार नेहमीच जो कोणी आपल्याला चांगला सल्ला देईल, त्याचा सन्मान करणारे आहे. त्यानुसार, जलतारा ही चांगला सल्ला असून त्याचा सन्मान आपलं सरकार करत आहे. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख श्री श्री रविशंकर यांचे मोलाचे योगदान आहे. अध्यात्म, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती यामध्ये श्री श्री रविशंकर यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे श्री श्री रविशंकर यांचे काम खूप मोठं आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

“आज आपण पाण्याचा एक एक थेंब वाचवत आहोत. त्यामुळे आपल्याला जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचे आहे. आम्ही जेव्हा दावोसमध्ये गेलो होतो, तेव्हा तिकडे आम्ही 1 लाख 37 हजार रुपयांचे एमओयू केले. आकडे वाढवण्यासाठी नाही तर, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी एमओयू केले आहेत. राज्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला असून, बरेच उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

“राज्यात आणि केंद्रात विकासाच्यादृष्टीने समविचारी सरकार आहे. लोकांना विश्वास पाहिजे असून, हाच विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. त्याच विश्वासाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना गती देत आहोत. उद्योग आले तर, रोजगार उपलब्घ होणार आहेत. आपले सरकार येऊन सहा महिने झाले असून, या सहा महिन्यात आपण घेतलेले निर्णय पाहिले असता एकही निर्णय वैयक्तिक नसून जनतेला लाभ देणारा आहे”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा महाराष्ट्र दौरा

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महत्त्वाच्या जलसंधारण प्रकल्पांच्या ठिकाणांनाही भेट देणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर येथून झाली. त्यानंतर नांदेड, वाटूर, तुळजापूर आणि पुणे येथे कार्यक्रमाला श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत. नांदेडमधील ऐतिहासिक गुरुद्वारा श्री हुजूर साहेब यांची भेट घेणार आहेत. तसेच, पुण्यात राज्यातील इतर १२ विद्यापीठांच्या भागीदारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष एज्युमीटमध्ये विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. मरकळ येथील आश्रमात सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता रुद्रपुजा होणार आहे.


हेही वाचा – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय शेख रशीद यांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -