गांजा, चरस तस्करीप्रकरणी ड्रग्ज पेडलरला अटक, सव्वातीन लाखांची रोकड हस्तगत

गांजा, चरस तस्करीप्रकरणी ड्रग्ज पेडलरला अटक, सव्वातीन लाखांची रोकड हस्तगत

drugs racket : राज्यात ड्रग्सविरोधात NCB ची मोठी कारवाई, एका वर्षात सुमारे ३०० कोटींचे ड्रग्स जप्त

गांजा आणि चरस तस्करीप्रकरणी रमजान गफुर शेख ऊर्फ कल्लन या 32 वर्षांच्या ड्रग्ज पेडलरला घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चरस, गांजासह सव्वातीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. भायखळा परिसरात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, या माहितीनंतर पोलिसांनी केळा मार्केटजवळील सुलभ शौचालयाजवळच साध्या वेशात पाळत ठेवून रमजान शेख याला ताब्यात घेतले.

अंगझडतीत पोलिसांना 80 हजार रुपयांचा 200 ग्रॅम वजनाचे चरस सापडले. त्याच्या राहत्या घरी आणखीन साठा असल्याचे तपासात उघडकीस येताच त्याच्या भायखळा येथील राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला होता, या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 20 हजार रुपयांचा 12 किलो गांजा आणि 3 लाख 25 हजार रुपयांची कॅश जप्त केली. तपासात रमजान हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत अनेकांना ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

30 किलो गांजासह महिलेस अटक

आंधप्रदेशातून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या गांजासह एका महिलेस जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी 30 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे. सकाळी सात वाजता जे. जे मार्ग परिसरात पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती, यावेळी एका टॅक्सीतून दोनजण संशयास्पद जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, पोलिसांनी टॅक्सीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता एक पुरुष प्रवाशी टॅक्सीतून उतरुन पळून गेला तर टॅक्सीत असलेल्या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. टॅक्सीची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 30 किलो गांजा सापडला, हा गांजा तीन रेक्झीन बॅगेत ठेवण्यात आला होता. तपासात ही महिला आंधप्रदेशातून हा गांजा घेऊन आली होती, तिला तेलगू वगळता इतर कोणतीही भाषा येत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याकूब मुल्ला यांनी सांगितले.


हेही वाचा – बोरांच्या वाटणीवरुन मजूर दाम्पत्याच्या चिमुकल्याची केली हत्या

 

 

 

First Published on: December 26, 2020 8:23 PM
Exit mobile version