Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम बोरांच्या वाटणीवरुन मजूर दाम्पत्याच्या चिमुकल्याची केली हत्या

बोरांच्या वाटणीवरुन मजूर दाम्पत्याच्या चिमुकल्याची केली हत्या

Subscribe

बोरांच्या वाटणीवरुन मजूर दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेने धुळे चांगलेच हादरले आहे. धुळ्यातील शिरपूर येथे बोरांच्या वाटणीवरुन मुलांमध्ये वाद झाला. रागात एकाने मजूर दाम्पत्याच्या सहा वर्षीय चिमुकल्याची हत्या केली. मृत मुलाच्या अल्पवययीन मित्राने दगडाने ठेचून ठार केल्याचा आरोप आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात ही घटना घडली.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह बुधवारी रात्री आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उकलण्यात धुळे पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे. बोरांच्या वाटणीवरुन झालेल्या भांडणाच्या रागातून चिमुकल्याची हत्या झाल्याचं उघडकीस आले. चिमुकल्याची दुपारी हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नवी अंतुर्ली भागात राहणाऱ्या मजूर दाम्पत्याचा तो मुलगा होता. मयत मुलाची आई मजुरीसाठी शेतात गेली होती. मुलागादेखील सोबत गेला होता. दुपारी खेळत असताना अचानक गायब झाल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह शेतात आढळला. घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट, ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, उमेश पाटील, स्वप्नील बांगर यांनी पाहणी केली.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -