राष्ट्रपती निवडणुकीत संसदेत ९९.१८ टक्के मतदान, २१ जुलैला लागणार निकाल

राष्ट्रपती निवडणुकीत संसदेत ९९.१८ टक्के मतदान, २१ जुलैला लागणार निकाल

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी आज निवडणुका पार पडल्या. आजच्या निवडणुकीत ९९.१८ टक्के मतदान झाले असून थोड्याचवेळात संसदेत सर्व बुलेट बॉक्स पोहोचतील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील बुहतेक सर्व खासदार, केंद्रीय मंत्री यांनी मतदान केले. तसेच, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आमदारांनी मतदान केलं. दरम्यान, २१ जुलैला मतमोजणी होणार असून २५ तारखेला नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे. (99.18 percentage voting done for president election)

आजच्या मतदानाविषयी अधिक माहिती देताना मुख्य रिटर्निंग अधिकारी यांनी देशात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती दिली. तसेच, संसदेत एकूण ९९.१८ टक्के मतदान पार पडल्याचेही सांगितले. थोड्याचवेळात बॅलेट बॉक्स संसदेत पोहोचतील.

शिरोमणी अकाली दलाच्या आमदाराकडून मतदानावर बहिष्कार

शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंह अयाली यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. पंजाबमधील अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत. तसेच, द्रौपदी मुर्मू यांची उमेदवार म्हणून निवड़ करण्याआधी पक्षासोबत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार घातला.

राष्ट्रपतीच्या पदासाठी महाराष्ट्रातून २८८ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आमदार अनिल देखमुख आणि नवाब मलिक हे तुरूंगात असल्याने ते मतदान करू शकले नाहीत. तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. तसेच शिवसेनेतील एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे २८३ आमदारांनी मतदान केले.

हेही वाचाराष्ट्रपती निवडणूक: शिंदे गटाला मोठा धक्का, एका आमदाराच्या मतदानावर बंदी

देशभर क्रॉस व्होटिंग

यूपी, गुजरात, ओडिशा ते आसामपर्यंत क्रॉस व्होटिंग पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील बरेली येथील सपा आमदार शाहजील इस्लाम यांनी द्रौपदी मुर्मू यांना जाहीर मतदान केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे शाहजील इस्लाम चर्चेत आले होते. यानंतर त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली. दुसरीकडे गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशा, आसाममध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंगचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशच्या बरेली मतदारसंघाचे शाहजील इस्लाम आमदार आहेत. शाहजील इस्लाम यांनी योगी यांच्यावर वक्तव्य केले होते, त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या विविध मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. शाहजील इस्लाम यांच्या पेट्रोल पंपावरही प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. आझम खान यांनी सपा नेत्यांच्या पक्षाला भेटण्यास नकार दिल्याने शाहजील इस्लामही त्यांच्या समर्थनात दिसले.

हेही वाचा – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खुलेआम क्रॉस व्होटिंग; काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीत धुसफूस

गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंग

गुजरातमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार कांधल एस जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगितले आहे. दरम्यान ओडिशा काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम म्हणाले, ते काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र मी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, मी माझ्या आतला आवाज ऐकला, ज्याने मला माझ्या मातीसाठी काहीतरी करायला सांगितले. म्हणूनच मी द्रौपदी मुर्मू यांना मत दिले. मात्र ओडिशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष न केल्याने मुकीम नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूं यांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

आसाममध्येही क्रॉस व्होटिंग

आसाममध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एआययूडीएफचे आमदार करीमुद्दीन बारभुईया यांनी केला आहे. करीमुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने रविवारी बैठक बोलावली होती. यावेळी फक्त 2-3 आमदार उपस्थित होते. यात बैठकीला फक्त जिल्हाध्यक्ष अधिक होते. यावरून काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर काँग्रेसच्या 20 हून अधिक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, यामुळे निकालात तुम्हाला संख्या कळेल, असा दावा त्यांनी केला.

 

First Published on: July 18, 2022 7:57 PM
Exit mobile version