Corona Live Update: वसईत आढळले २११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

Corona Live Update: वसईत आढळले २११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

वसई विरार महापालिका हद्दीत रविवारी दिवसभरात कोरोनाचे नवे २११ रुग्ण आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्याने वसईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवसभरात विरारमध्ये ८९, वसईत ५९, नालासोपार्‍यात ५४ आणि नायगाव परिसरात ९ नवे रुग्ण आढळून आले. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार १७० झाली असून आतापर्यंत १२६ जणांचे प्राण गेले आहेत. वसईच्या ग्रामीण भागात दिवसभरात फक्त एकच रुग्ण आढळल्याने गावकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वसईच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या २७९ वर गेली असून आठ जणांचा जीव गेला आहे

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २०१ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ३२६वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ९३५ झाला आहे. सविस्तर वाचा 


दिल्लीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्लीत २४ तासांत १ हजार ३७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख पार झाला आहे. दिल्लात आतापर्यंत १ लाख ८२४ कोरोनाबाधित रु्ण आढळले असून त्यापैकी ७२ हजार ८८ रुग्ण रिकव्हर झाले आहेत आणि २५ हजार ६२० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. तसेच २४ तासांत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत दिल्लीत ३ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून २०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २६ झाला आहे. सविस्तर वाचा 


कल्याण-डोंबिवलीतील या रुग्णालयाची आयुक्त, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी

वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना खाटा मिळाव्यात यासाठी जम्बो सुविधा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. डोंबिवली क्रीडा संकुलात सुसज्ज असे १८५ खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले असून सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. मंगळवारपासून हे रुग्णालय सुरू होणार आहे.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडा संकुलात १५५ ऑक्सिजन आणि ३० आयसीयू खाटा असलेले रुग्णालय उद्यापासून सुरू केले जाणार आहे मोठ्या रुग्णालयात देखील नसलेल्या सुविधा याठिकाणी दिल्या जाणार आहेत. याशिवाय ४ दिवसात डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे २०० ऑक्सिजन, जीमखण्यात तसेच कल्याण पश्चिमेत ५०० खाटांचे अशा एकूण १००० खाटा पेक्षा जास्त क्षमतेची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्यामुळे रुग्णांना खाटासाठी फिरावे लागणार नाही. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली असून तज्ञ डॉक्तराची फौज याठिकाणी रुग्णाच्या सेवेसाठी आमच्या बरोबर सज्ज झाली आहे असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

तर आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी वाढत्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना खाटा मिळाव्यात यासाठी जम्बो सुविधा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. यासाठी शासनाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे पूर्णपणे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय तयार करणे शक्य झाले असून बंदिस्त क्रीडासंकुलातील या रुग्णालयात उद्यापासून रुग्णांना सेवा दिली जाईल. याखेरीज १५ जुलै पासून ४०० आयसीयू आणि १००० ऑक्सिजनची सुविधा असलेले रुग्णालय सुरू केले जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी घाबरू नका, टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून पुढील काळात आणखी टेस्टिंग वाढणार आहेत यामुळे रुग्ण वाढतील मात्र त्याचयासाठी सुविधा कमी पडणार नाहीत.

नॉन कोव्हीड रुग्णासाठी शहरातील सर्व रुग्णलाय सुरू ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या असून काही अपवाद आहेत यामुळे या रुग्णलयावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईंग स्क्वाड तयार करण्यात आले आहे तर जास्त बिलाच्या तक्रारी साठी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत रुग्णालयाना शासनाच्या नियमानुसार बिल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रुग्णाच्या स्वॅब टेस्टिंगचे अहवाल २४ तासात देण्याचे निर्बंध लॅबना घालण्यात आले आहेत तर रुग्णाच्या अति जवळच्या नातेवाईकांनी स्वॅब टेस्टिंगची घाई करु नये. ५ दिवसात त्यांच्या टेस्टची व्यवस्था केली जाईल असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ अंतर्गत येणारी सहा पोलीस ठाण्यातील तब्बल ७८ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्यामध्ये एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. निजामपूर – ६ , भोईवाडा – ९ , नारपोली -२२ , कोनगाव – ४, शांतीनगर – १२, शहर -१९  यांसह नियंत्रण कक्ष – ६ अशा एकूण  ७८ पोलीस अधिकारीसह कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले असून अजूनही ३२ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


राज्यात २४ तासांत सर्वाधिक २७९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५ हजार ४५४वर पोहोचला असून सध्या १ हजार ७८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


एसटी महामंडळात कोरोनाचा आकडा २०० पार

कोरोना विरुद्धच्या लढाईतील एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. एसटी मधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. आतांपर्यत राज्यात एकूण २०६  कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी हे ठाणे विभागात असून त्यांच्या आकडा ८६ इतका आहे. तर मुंबई विभागात ६४  कर्मचारी बाधित झाले आहेत. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून ५  कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, अशी माहिती एसटी महामंडळांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


कोविड -१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या अनावश्यक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरातील पोलिसांनी संध्याकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असताना औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ८५ पुरूष तर ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६ हजार ८८० कोरोनाबाधित आढळले आहेत. (सविस्तर वाचा)


कोरोनाचा संसर्ग १४ टक्क्यांनी झाला कमी

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच दिल्लीकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील संसर्ग दोन आठवड्यात १४ टक्क्यांनी कमी झाला आहे. आता १०० लोकांपैकी १० लोकांनाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. एका वेळी ही संख्या ३५% इतकी होती. मात्र, आता हीच संख्या १०% वर आली आहे. (सविस्तर वाचा)


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २४ हजार २४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली असून मृतांची संख्या १९ हजार ६९३ झाली आहे. तसेच २ लाख ५३ हजार २८७ active केसेस असून ४ लाख २४ हजार ४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात आतापर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ जणांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये रविवारी १ लाख ८० हजार ५९६ जणांची चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


राज्यात ६५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २,०६,६१९ झाली आहे. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ३६५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ टक्के एवढे झाले आहे.


मुंबईमध्ये १३११ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार १२५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८९६ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये रविवारी १३११ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४२ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४३ जण हे ६० वर्षांवरील, तर २२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ६९ मृत्यू हे गट ४८ तासांमधील आहेत.

First Published on: July 6, 2020 9:27 PM
Exit mobile version