घरताज्या घडामोडीCorona: चिंताजनक! राज्यात २४ तासांत आढळले २७९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Corona: चिंताजनक! राज्यात २४ तासांत आढळले २७९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आढळले आहेत. कोरोनाच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात कोरोनाचा धोका सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत २७९ कोरोनाबाधित पोलीस आढळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५ हजार ४५३वर पोहोचला असून यापैकी सध्या १ हजार ७९ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. पोलीस दलात नव्या कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटात पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. मागील २४ तासांत २७९ नव्या कोरोनाबाधित पोलिसांची वाढ झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलाच्या चिंतेत भर पडली आहे.

काल राज्यात ६ हजार ५५५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ६ हजार ६१९वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ८२२ झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा यादी देश आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने कोरोनाबाधितांचा यादीत रशियाला मागे टाकले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबाद शहरात पुन्हा लॉकडाऊन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -