घरताज्या घडामोडीदिल्लीकरांसाठी दिलासा : कोरोनाचा संसर्ग १४ टक्क्यांनी झाला कमी

दिल्लीकरांसाठी दिलासा : कोरोनाचा संसर्ग १४ टक्क्यांनी झाला कमी

Subscribe

दिल्लीतील संसर्ग दोन आठवड्यात १४ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच दिल्लीकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील संसर्ग दोन आठवड्यात १४ टक्क्यांनी कमी झाला आहे. आता १०० लोकांपैकी १० लोकांनाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. एका वेळी ही संख्या ३५% इतकी होती. मात्र, आता हीच संख्या १०% वर आली आहे.

दिल्ली आरोग्य विभागाच्या माहितीनुसार; २३ जूनपर्यंत हा दर २४ टक्के इतका होता. जो आता १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. २३ जून रोजी १६ हजार १५२ लोकांपैकी ३ हजार ९४७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. ज्यावेळी कोरोना संसर्गाचे प्रमाण २६ टक्के होते. तर ५ जुलै रोजी २३ हजार १३६ लोकांपैकी २ हजार २४४ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संसर्ग दर ९.८ टक्के इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या दोन आठवड्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, १५ मे रोजी हाच दर ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सरासरी ६ हजार ५०० च्या संख्येत कोरोनाची प्रकरणे समोर येत होती. तर ५ जूनपर्यंत हा दर २७ टक्के होता.

विशेष म्हणजे रविवारी कोरोना विषाणूची २ हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ८३ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत सध्या कोरोनाबाधितांचा आकडा ९९ हजार ४४४ इतका झाला आहे. तर आतापर्यंत दिल्लीमध्ये ७१ हजार ३३९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३ हजार ६७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या दिल्लीत २५ हजार ३८ active केसेस आहेत.

- Advertisement -

१५ हजार बेड्सची सोय

सध्या बेड्सची काही कमी नाही आहे. कारण आमच्याकडे १५ हजार बेड्सची सोय असून यातील ५ हजार ३०० जणांवर सध्या उपचार सुरु आहे. मात्र, आयसीयू बेड्सची कमी जाणवत आहे.  – अरविंद केजरीवाल; दिल्लीचे मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -