पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येची अफवा, यंत्रणा हाय अलर्टवर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येची अफवा, यंत्रणा हाय अलर्टवर

पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हत्येची इस्लामाबाद (Islamabad) येथे अफवा पसरल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे इस्लामाबाद पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली असून यंत्रणांना हाय अलर्ट (High Alert) जारी केला आहे.

पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ (Pakistan-Tehrik-E-Insaf) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान आज रविवारी इस्लामाबाद येथे येणार होते. मात्र, त्यांच्या हत्येची अफवा पसरल्याने शहरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, इस्लमाबाद पोलिसांच्या (Islamabad police) प्रवक्त्यांनी शनिवारी सांगितले की, शहरात कलम १४४ लागू केला असून परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटलं की, पाकिस्तान-तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांकडून सहयोगाची अपेक्षा आहे.

हेही वाचा – Pakistan Political Crisis: ‘या’ पाच चुकांमुळे इम्रान खान यांच्या हातातून गेले पाकिस्तान: आता पुढे काय करणार? वाचा

इम्रान खानचा भाचा हसन नियाजी यांनी म्हटलं आहे की, “जर इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला तर तो संपूर्ण पाकिस्तानवर हल्ला झाल्याचं मानलं जाईल. आणि असं करणाऱ्याला पश्चाताप करावा लागेल.”

फवाद चौधरी यांनी आधीच सांगितलं होतं की, पीटीआयचे अध्यक्ष इमरान खान रविवारी इस्लामाबाद येथे येणार आहेत. मात्र त्यांच्या हत्येची अफवा पसरली.

दरम्यान इम्रान खान पंतप्रधान पदावर असताना त्यांच्या हत्येचे कारस्थान रचण्याची सूचना अनेक एजन्सींना देण्यात आली असल्याची माहिती फवाद चौधरी यांनी दिली होती. म्हणून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

First Published on: June 5, 2022 3:50 PM
Exit mobile version