घरताज्या घडामोडीPakistan Political Crisis: 'या' पाच चुकांमुळे इम्रान खान यांच्या हातातून गेले पाकिस्तान:...

Pakistan Political Crisis: ‘या’ पाच चुकांमुळे इम्रान खान यांच्या हातातून गेले पाकिस्तान: आता पुढे काय करणार? वाचा

Subscribe

पाकिस्तानमध्ये गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेले राजकीय संकट अखेर संपले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तान संसदेत शनिवारी दिवसभर चांगले नाट्य रंगले होते. रात्री उशिरा सभापती, उपसभातींनी राजीनामा दिला. मग नव्या सभापतींनी अविश्वासाच्या ठरावावर मतदान घेतले. यामध्ये इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे इम्रान खान यांच्या हातातील पाकिस्तानाची सत्ता गेली. आता विरोधी पक्षाकडून सरकार स्थापन करण्याचा ठराव सादर केला आहे. दरम्यान कोणत्या पाच चुकांमुळे इम्रान खान यांच्या हातातून पाकिस्तानाची सत्ता गेली? आणि आता पुढे इम्रान खान काय करणार? हे जाणून घ्या.

‘त्या’ पाच चुका, ज्यामुळे गेले इम्रान खान यांच्या हातातील सत्ता

१) लष्करासोबत संबंध बिघडवले

- Advertisement -

२०१८ची निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान यांच्याकडे पूर्ण बहुमत नव्हते. तेव्हा त्यांना लष्करांची साथ मिळाली आणि ते सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले. राजकीय विश्लेषक प्रोफेसर अरुण शर्मा म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सरकार कोणाचेही असले तरी फक्त लष्कराचेच चालते. सुरुवातीला इम्रान यांना लष्कराची साथ मिळाली, परंतु गेल्या काही दिवसांपासून ते लष्करविरोधात बोलायला लागले. लष्कर प्रमुख बाजवा आणि इम्रान खान यांचे संबंध बिघडू लागले. अखेर लष्कराने इम्रान सरकारमधून हात बाहेर काढले आणि विरोधकांना सरकार पाडण्याची संधी मिळाली.

२) कामाच्या जागी धर्माचा प्रचार केला सुरू

- Advertisement -

पाकिस्तानला महागाई, गरीबी, पाणी संकटातून बाहेर काढण्याऐवजी इम्रान खान यांनी धर्माचे राजकारण सुरू केले. ते संपूर्ण जगभरात स्वतःला इस्लामी देशांचा मसिहा म्हणून दाखवू लागले. इम्रान खान आपल्या प्रत्येक भाषणात इस्लाम, इस्लाम आणि इस्लामबाबत बोलू लागले होते. यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीन बिघडू लागली. यामुळे विरोधकांना सरकार पाडण्याची दुसरी संधी मिळाली.

३) चीनकडून कर्ज अन् अमेरिकेशी पंगा

सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी डोळे बंद करून चीनवर विश्वास ठेवला. चीनकडून भरपूर कर्ज घेतले. अमेरिकेविरोधात ते बोलू लागले. यामुळे अमेरिकेने मदत करणे बंद केले. मग दुसरीकडे चीन कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकू लागला. यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

४) महागाईदरम्यान वाढवला कर

सरकार स्थापन केल्यानंतर इम्रान खान यांनी महागाई कमी करण्याऐवजी कर वाढवला. यामुळे सर्वसामान्य जनता आणखीन हैराण झाली. महागाई अजूनच वाढली. विरोधकांनी हा मुद्दा धरून लावला आणि इम्रान खान यांचे समर्थन देणाऱ्या पक्षांना आपल्या बाजूने केले. यामुळे इम्रान खान अल्पमतात आले.

५) भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली विरोधकांना आणले अडचणीत

भ्रष्टाचार रोखण्याच्या नावावर इम्रान खान यांनी विरोधी पक्ष नेत्यांना खूप त्रास दिला. शहबाज शरीफ, भुट्टोपासून मौलाना फजल-उर-रहमानपर्यंत सर्वांच्या निवासस्थानावर छापेमारी केली. शहबाज शरीफ यांना जेलमध्ये पाठवले होते. यामुळे विरोधकांची एकजूट झाली.

आता इम्रान खान काय करणार?

राजकीय विश्लेषक प्रो. शर्मा म्हणाले की, सत्ता गमावून बसलेले इम्रान खान यांच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, नवीन सरकारला स्वीकारून निवडणुकापर्यंत शांत राहणे. आणि दुसरा पर्याय आहे की, ज्याप्रकारे ते जनतेमध्ये जाऊन रॅली करत आहेत, हे कायम ठेवणे. त्यांच्याविरोधात कट रचला गेला आहे, असे जनतेला सांगणे. त्यामुळे आता इम्रान खान दुसऱ्या पर्याय निवडण्याची अधिक शक्यता आहे. इम्रान खान हार मानणार नाहीत आणि ते परदेशी षडयंत्रेचा आरोप लावून तसेच वातावरण जनतेत निर्माण करतील. रॅलीत सतत इम्रान खान विरोधकांवर हल्लाबोल करत राहतील. अशात सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करू शकते. जर असे झाले तर इम्रान खान जेलमध्येही जाऊ शकतात.


हेही वाचा – Imran Khan : इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर; शेहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -