संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई

संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आली. ज्यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी यावर तीव्र निषेध व्यक्त केला. अशात आता लोकसभा सचिवालयाने आणखी एक नवा आदेश खासदारांसाठी पारित केला आहे. ज्यानुसार आता दिल्लीच्या संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने, उपोषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : संसदेत आता जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद अशा डझनभर शब्दांवर बंदी; पाहा पूर्ण लिस्ट

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली काही शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे. ज्यांना असंसदीय अभिव्यक्ती या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत दोन्ही सभागृहांच्या कामकाजात भाग घेणारे खासदार चर्चेदरम्यान जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, विनाश पुरुष, खलिस्तानी, जयचंद आणि भ्रष्ट अशा शब्दांचा वापर करु शकत नाहीत. या शब्दांशिवाय संसदेत टार्गेट करण्यासाठी वापरण्यात येणारी चाइल्ड इंटेलिजन्स, स्नूपगेट, बालबुद्धी या शब्दांच्या वापरावरही बंदी घालण्यात येणार आहे.

शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड आणि अक्षम असे सर्रास वापरले जाणारे शब्दही आता लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील. या शब्दांशिवाय शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू आदी शब्दही दोन्ही सभागृहात वापरले जाणार नाहीत. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेनुसार, अशा शब्दांचा वापर “बेकायदेशीर आचरण” मानला जाईल आणि सभागृहाच्या कामकाजाचा भाग होणार नाही.

या श्रेणीतील शब्दांमध्ये कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, गद्दार, करप्ट, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, बहरी सरकार, संवेदनहीन, बॉबकट, विश्वासघात लॉलीपॉप, सेक्सअल हरेसमेंट शब्द देखील समाविष्ट केले आहेत.

याशिवाय bloodshed, bloody, betrayed, ashamed, abused, cheated,chamcha, chamchagiri, chelas, childishness, corrupt, coward, criminal, crocodile tears, disgrace, donkey, drama, eyewash, fudge, hooliganism, hypocrisy, incompetent, mislead, lie, untrue अशा इंग्रजी शब्दांचा वापर देखील असंसदीय मानला जाईल.

लोकसभा सभापती ओम बिर्ला स्पष्टीकरण

असंसदीय शब्द कोणत्या संदर्भात वापरला हे महत्त्वाचे ठरते; पण तो रोखता येत नाही. सरकार कोणत्याही शब्दावर बंदी घालू शकत नाही किंवा कधीही लोकसभेला निर्देश तसे देऊ शकत नाही. लोकसभा आणि राज्यसभेत होणाऱ्या चर्चेत कोणताही शब्द वा बंदी घालण्यात आलेली नाही, सन्माननीय संसद सदस्यांना घटनेने सभागृहात अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेय. संसदेच्या कामकाजातून असंसदीय शब्दांना हटविण्याचा निर्णय केवळ सभापतीच्या निर्देशावरून घेतला जातो. त्यात सरकार कोणताही हस्तक्षेप करु शकत नाही, एखादा शब्द असंसदीय ठरवून हटविल्यास त्यावर सदस्याने आक्षेप घेतल्यास प्रकरण विशेषाधिकार समितीकडे जाते. अस स्पष्टीकरण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहे.


सरकार कोणत्याही शब्दांवर बंदी घालू शकत नाही; लोकसभा सभापती ओम बिर्ला स्पष्टच म्हणाले…

First Published on: July 15, 2022 1:57 PM
Exit mobile version