देशातील वीज संकट वाढलं, पुरवठ्यात 10.77 गीगावॅटचा तुटवडा

देशातील वीज संकट वाढलं, पुरवठ्यात 10.77 गीगावॅटचा तुटवडा

देशातील वीज संकट वाढलं, पुरवठ्यात 10.77 गीगावॅटचा तुटवडा

देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेचे संकट निर्माण झालं आहे. गर्मीमुळे विद्युत पुरवठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे अनेक राज्यात भारनियमण करण्यात येत आहे. कोळशाच्या टंचाईमुळे देशातील विजेचे संकट गडद होऊ लागले आहे. सोमवारी 5.24 गीगावॅटचा तुटवडा होता तर गुरुवारी तो तुटवडा 10.77 गीगावॅटवर गेला आहे. नॅशनल ग्रिड ऑपरेटर, पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन च्या माहितीनुसार रविवारी सर्वात व्यस्त असलेल्या वेळात फक्त 2.64 गीगावॅटचा तुटवडा होता. जो सोमवारी 5.24 GW, मंगळवारी 8.22 GW, बुधवारी 10.29 GW आणि गुरुवारी 10.77 GW होता.

देशात 29 एप्रिल 2022 रोजी जास्तीत जास्त वीज मागणी 207.11 गीगावॅटच्या सर्व काळातील उच्चांकावर पोहचली आहे. त्यामुळे शुक्रवारी विजेचा तुटवडा 8.12 गीगावॅट वर आला. देशभरात कडाक्याच्या उष्ण वातवारणामुळे या आठवड्यात वीजपुरवठा तीन वेळा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

देशात व्यस्त वेळ म्हणजेच पीक हवर्समध्ये सर्वाधिक वीजेची मागणी मंगळवारी झाली. वीज मागणी 201.65 वर पोहोचली होती. 7 जुलै 2021 रोजी ते 200.53 GW होते. गुरुवारी विजेची कमाल मागणी 204.65 GW च्या विक्रमी उच्चांकावर होती आणि शुक्रवारी 207.11 GW च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. बुधवारी ते 200.65 GW होते. या आकडेवारीवरून विजेची मागणी वाढल्याचे स्पष्ट होते आणि त्यामुळे काही दिवसांतच देशातील विजेचे संकट अधिक गडद झाले आहे.

विजेचं संकट टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या नेतृत्वाखालील सर्व भागधारकांना थर्मल पॉवर स्टेशनमधील कोळशाचा साठा कमी करणे, प्रकल्पांवरील रॅक जलदपणे रिकामे करणे आणि त्यांची उपलब्धता वाढवणे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी बिघडू शकते, उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही स्थिती असताना मे आणि जून महिन्यातच परिस्थिती काय असेल, याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ऊर्जा मंत्रालयाने सांगितले होते की मे-जून 2022 मध्ये विजेची मागणी सुमारे 215-220 GW पर्यंत पोहोचू शकते.


हेही वाचा : एनडीए कोर्सचे तीन मित्र आज लष्कर, नौदल आणि हवाई दलचे प्रमुख

First Published on: May 1, 2022 5:10 PM
Exit mobile version