लान्स नायक संदीप सिंग यांना वीरमरण

लान्स नायक संदीप सिंग यांना वीरमरण

सर्जिकल स्ट्राइक दरम्यान सिंग यांना वीरमरण

काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात झालेल्या चकमकीत जवानाला वीरमरण आले असल्याची माहिती समोर आली आहे. अतिरेक्यांविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक दरम्यान लान्स नायक संदीप सिंग यांना वीर मरण आले आहे. काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात झालेल्या चकमकीत सिंग शहीद झाले आहेत. मात्र सिंग यांना वीरमरण येण्यापूर्वी त्यांनी अतिरेक्यांशी दोनहात करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

नेमके काय घडले?

तंगधार सेकटरच्या गगाधारी नार परिसरात लान्स नायक संदीप सिंग ४ पॅरा कमांडोच्या टीमसोबत सर्च ऑपरेशन करत होते. त्यावेळी सिंग यांना दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी अतिरेक्यांचा पाठलाग सुरु केला. यावेळी सिंग यांच्या टीमची अतिरेक्यांसोबत चकमक झाली. अतिरेक्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये सिंग यांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत तीन अतिरेक्यांचा खात्मा करत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. ही चकमक सुरुच असताना ते जखमी झाले. तरीही देखील ते प्रतिकार करत होते. मात्र या चकमकीत त्यांना गोळी लागली. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले.

सिंग यांच्याविषयी थोडस

पाकव्याप्त काश्मीरमध्ये २०१६ साली अतिरेक्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक दरम्यान त्यांनी शौर्य गाजविले होते. संदीप सिंग हे पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी होते. शहीद लान्स नायक संदीप सिंग यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा कुटुंब परिवार आहे.

वाचा – जम्मू – काश्मीरमध्ये पोलिसाला वीरमरण

वाचा – कुर्ल्याच्या उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणेंचे नाव देणार

First Published on: September 25, 2018 5:05 PM
Exit mobile version