घरदेश-विदेशजम्मू - काश्मीरमध्ये पोलिसाला वीरमरण

जम्मू – काश्मीरमध्ये पोलिसाला वीरमरण

Subscribe

जम्मू - काश्मीरमधील बारमालूत भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये पोलिसाला वीरगती प्राप्त झाली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून शोध मोहिम राबवली गेली आहे.

जम्मू – काश्मीरमधील बालमालूत येथे झालेल्या चकमकीमध्ये १ पोलीस शहिद झाला आहे तर ३ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लष्कराने देखील दहशतवाद्यांना जोख प्रत्युत्तर दिले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पहाटे ४ वाजता गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून पोलीस दल आणि लष्कराने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम राबवली गेली. बालमालूत येथील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराने पोलिसांच्या मदतीने परिसरात शोध मोहिम राबवली. याचवेळी दहशतवाद्यांनी लष्करावर बेछूट गोळीबार करायला सुरूवात केली. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला तर ३ जण जखमी झाले.

कारवाईला सुरूवात

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून लष्कराने बालमालू भागात दहशतवादी एका घरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कराने पहाटे ४ वाजता शोध मोहिम राबवली. पण, नेमके किती दहशतवादी लपून बसले आहेत याबद्दल लष्कराला कोणतीही कल्पना नव्हती. ज्यावेळी लष्कर दहशतवादी लपून बसलेल्या घराजवळ पोहोचले त्याचवेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबाराला सुरूवात केली. ज्यामध्ये १ पोलीस शहीद झाला तर ३ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर आहे. परिसरामध्ये सध्या व्यापक शोधमोहिम राबवली जात आहे.

- Advertisement -

सतर्कतेचा इशारा

स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लष्कराला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. दिवसेंदिवस दहशवादी कारवाया वाढत असून लष्कराकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवाय, गुप्तचर विभागाने देखील दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती दिली आहे. याला पाकिस्तानी लष्कराची फूस आहे हे विशेष! त्यामुळे जवान देखील आता डोळ्यात तेल घालून पेट्रोलिंग करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -