घरमुंबईकुर्ल्याच्या उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणेंचे नाव देणार

कुर्ल्याच्या उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणेंचे नाव देणार

Subscribe

शहीद कौस्तुभ राणे कायम आठवणीत राहावे यासाठी मुंबईतील कुर्ला येथील उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव देण्यात येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली यासंदर्भात मागणी केली होती.

दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांचे नाव कुर्ल्याच्या उड्डाणपुलाला देण्यात येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी यासंदर्भात मागणी केली होती. स्थापत्य समितीने ही मागणी मान्य केली असून प्रशासकीय मंजुरीनंतरच ही मागणी पूर्ण होणार आहे. ७ ऑगस्ट २०१८ ला दहशताद्यांशी लढताना कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते.

कुर्ला उड्डाण पुलाला नाव देणार

देशाच्या रक्षणासाठी लढताना वीरमरण आलेल्या कौस्तुक राणे यांची आठवण कायम राहावी यासाटी कुर्ला येथील उड्डाण पुलाला मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे हे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीमध्ये ही मागणी केली बोती. स्थापत्य समितीने ही मागणी मान्य केली असून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पाठवली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कुर्ला-सांताक्रुझ टर्मिनस रोड ते स. गो. बर्वे मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाला कौस्तुभ राणेंचा नाव देण्यात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रपतींकडून सेना पदक प्रदान

जम्मू-काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये ८ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची अहूती देणाऱ्या शहीद कौस्तुभ राणे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदक प्रदान करण्यात आले होते.

संबंधित बातम्या – 

मीरा रोडचे कौस्तुभ राणे जम्मू-काश्मीरच्या चकमकीत शहीद
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -