लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वतःच्या दमदार अभिनयाने सिने सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणेज सुबोध भावे. अभिनेता सुबोध भावे(subodh bhave) याने देवयानी, तुला पाहते रे(tula pahate re) यांसारख्या मालिकांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तर लोकमान्य – एक युगपुरुष(lokmanya- ek yugpurush), संगीत कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व(bal gandharav), आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या चित्रपटांमधून सुबोध भावेने(subodh bhave) आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.

हे ही वाचा – ढालेपाटलांच्या सुनांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

सुबोध भावे यांचा अभिनय, भाषेवर असलेलं प्रभुत्व, बोलण्याची शैली या सगळ्यांमुळेच सुबोध भावे मराठी सिने सृष्टीतील एक आघडीचा कलाकार आहे. सुबोध भावे(subodh bhave) तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सुबोध भावेचा ‘बस बाई बस'(bus bai bus) हा नवीन कार्यक्रम लवकरच(new show) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा – ‘कॉफी विथ करण’ शो एवढा हिट का होतो? करण जोहरने सांगितले कारण

 हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

सुबोध भावे त्याची प्रत्येक भूमिका अगदी जीव ओतून करतो. आता सुबोध भावे(subodh bhave) एक विशेष बस घेऊन येणार आहे. ही बस महिलांसाठी विशेष असणार आहे. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पाड्यावर दिसणार आहे. या नव्या कार्यक्रमाची महिला वर्गात क्रेझ दिसत आहे. अनेक वाहिन्यांवर अनेक कार्यक्रम सध्या सुरु आहेत. आशातच हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा – आषाढी वारी २०२२: विठ्ठल रुक्मिणीच्या भव्य प्रतिमा असलेल्या चित्ररथला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद

‘बस बाई बस’ कार्यक्रमाचा टीझर आऊट

‘बस बाई बस'(bus bai bus) या आगामी कार्यक्रमाचा नुकताच टीझर आऊट करण्यात आला आहे. २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री साडे नऊ वाजता या कार्यक्रमाची मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. झी मराठीने त्यांचा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हे ही वाचा – अरे वा! गणपतीत कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त ३२ रेल्वेगाड्या, आजपासूनच बुकिंग सुरू

 

 

 

 

First Published on: July 8, 2022 11:27 AM
Exit mobile version