तुमचे विजयी भाषण युट्यूबवर प्रदर्शित करण्याची हीच वेळ, विवेक अग्निहोत्रींचा केजरीवालांना टोला

तुमचे विजयी भाषण युट्यूबवर प्रदर्शित करण्याची हीच वेळ, विवेक अग्निहोत्रींचा केजरीवालांना टोला

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून मोदींनी डंका वाजवला आहे. परंतु यामध्ये काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी गुजरात वासियांना अनेक आश्वासनं दिली होती. परंतु ती फोल ठरली. दरम्यान, द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरील टीकेची आठवण करुन देत ट्विटरवरून केजरीवालांचे अभिनंदन करत खोचक टीका केली. त्यांनी ट्विट करत केजरावालांना टॅग केले. तसेच तुमचे विजयी भाषण युट्यूबवर प्रदर्शित करण्याची हीच वेळ आहे, असंही विवेक अग्निहोत्री म्हणाले.

विविक अग्निहोत्रीने एक व्हिडीओ क्लिप ट्वीट करुन लिहिले, विजयासाठी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. आता तुम्ही तुमचे विजयी भाषण युट्यूबवर विनामूल्य रिलीज करण्याची हीच वेळ आहे. ही खोटी नसून सत्यकथा आहे, असं लिहित अग्निहोत्री यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते केजरीवाल?

चित्रपट दिग्दर्शक कोटींची कमाई करत आहेत. त्यामुळे सगळ्यांना चित्रपट दाखवयाचा असेल तर तो युट्यूबवर फ्रीमध्ये टाकायला सांगा, असं केजरीवाल म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अग्निहोत्री यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.


हेही वाचा : ‘खाकी: द बिहार चॅप्टर’मुळे IPS अधिकारी अमित लोढा निलंबित; अनेक गुन्हे दाखल


 

First Published on: December 9, 2022 3:45 PM
Exit mobile version