Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousसूर्याच्या राशीपरिवर्तनाने 'या' 3 राशींवर पडणार अशुभ प्रभाव

सूर्याच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ 3 राशींवर पडणार अशुभ प्रभाव

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. जेव्हा एखाद्या ग्रहाचे राशीपरिवर्तन होते तेव्हा त्याचा शुभ-अशुभ परिणाम सर्व राशींवर होतो. 16 जुलै रोजी सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला असून यामुळे पाश्विक योग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या योगाला अत्यंत घातल मानले जाते. त्यामुळे काही राशींवर या योगाचा अशुभ परिणाम होईल ज्यामुळे त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पाश्विक योगाचा ‘या’ राशींवर होणार अशुभ परिणाम

- Advertisement -
  • मिथुन

ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग अशुभ ठरणार असून या काळात कोणतीही खरेदी करु नका. या काळात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वाद-विवाद संभावतात.

  • कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग अशुभ असेल. या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक आयुष्यात समस्या उद्भवू शकतात. आईची तब्येत बिघडू शकते.

- Advertisement -
  • धनु

धनु राशीच्या व्यक्तींना देखील या योगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वादविवादापासून दूर राहा.


हेही वाचा : शुक्राच्या वक्री चालीने ‘या’ 3 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

- Advertisment -

Manini