घरमहाराष्ट्रSushma Andhare : ...हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने उगवलेला सूड, अंधारेंचे शरसंधान

Sushma Andhare : …हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने उगवलेला सूड, अंधारेंचे शरसंधान

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गटबाजी तसेच रुसवेफुगवेही पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे युतीत येणार असतील तर…, काय म्हणाले अजित पवार?

- Advertisement -

राज्यात 2014मध्ये भाजपा-शिवसेना सरकार असताना शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण या खात्यांची जबाबदारी भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना 2019च्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या शीतयुद्धाचा हा फटका असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. परंतु 2020मध्ये विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आले. तर, 2021मध्ये त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विनोद तावडे यांनीच 2 मार्च रोजी भाजपाची 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाने पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा समावेश आहे. एकूणच पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्री तसेच, दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. तर, सध्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

हेही वाचा – Chitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि नंतर भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. इंदापूर मतदारसंघात 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा हर्षवर्धन पाटील या बड्या नेत्याला पराभवाची धूळ चारत अजित पवार यांनी आपला हुकूमी एक्का दत्तात्रय भरणे यांना विधानसभेत पाठविले आहे. इंदापूर हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी ट्वीट केले आहे. भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची मान विनोद तावडे यांना मिळणे किंवा “अजित पवार चक्की पीसिंग” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटलांच्या नाकदुऱ्या काढण्याची जबाबदारी आली आहे. हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने उगवलेला सूड असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Pawar Family : पवार कुटुंबातील फुटीबाबत शरद पवारांच्या बहिणीचा मोठा दावा, म्हणाल्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -