घरताज्या घडामोडीVBA - BRS : महाविकास आघाडीचे वंचितसोबत बिनसले? केसीआर यांचा प्रकाश आंबेडकरांना...

VBA – BRS : महाविकास आघाडीचे वंचितसोबत बिनसले? केसीआर यांचा प्रकाश आंबेडकरांना मैत्रीचा हात

Subscribe

मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चा बिनसल्यात जमा आहे. आघाडीने प्रकाश आंबेडकरांना चार जागांची ऑफर दिली होती. त्याला वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला आहे. तर आज (21 मार्च) संजय राऊत यांनी वंचित आमच्यासोबत असायला पाहिजे होता, असा उल्लेख केला आहे. वंचितचा भूतकाळात उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे वंचित आणि केसीआर यांची बीआरएस यांची एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तेलंगणांत दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे. केसीआर यांचे मराठवाड्यातील नेते कदीर मौलाना हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी अकोल्याला गेले आहेत. कदीर मौलाना यांच्या मार्फत केसीआर यांनी प्रकाश आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. हैदराबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळ्याच्या अनावरणासाठीही केसीआर यांनी आंबेडकरांना निमंत्रित केले होते. तेव्हापासूनच वंचित आणि बीआरएस यांच्या आघाडीची चर्चा सुरु झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा : ECI : निवडणूक आयोग केंद्र सरकारवर बरसले; विकसित भारत संपर्क तत्काळ बंद करा

प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्यामुळे ते आता नव्या मित्राच्या शोधात आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी हैदराबाद स्थित एआयएमआयएम सोबत आघाडी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी तेलंगणाकडे मोर्चा वळवला आहे. बीआरएस देखील महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. त्यांनी एक वर्षापासूनच महाराष्ट्रात तयारी सुरु केली होती. दरम्यान तेलंगणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बीआरएस नेते केसीआर यांचे महाराष्ट्रातील दौरे थांबले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, केसीआर यांच्यासोबत बहुजन समाज पक्षाने आधीच आघाडी केली आहे. तेलंगणात हे दोन्ही पक्ष एकत्रित लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बीआरएस आणि बीएसपी आघाडी तेलंगणासह महाराष्ट्रातही एकत्रित निवडणूक लढवणार का? हाही प्रकाश आंबेडकरांसमोरील प्रश्न असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -