Wednesday, May 8, 2024
घरमानिनीHealthसकाळी उठल्यावर लगेचच फोन पाहणे टाळा ! नाहीतर...

सकाळी उठल्यावर लगेचच फोन पाहणे टाळा ! नाहीतर…

Subscribe

मोबाईल आता आपल्या आयुष्याचा एका भाग बनला आहे. अलीकडच्या काळात मोबाइल वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. काहींना तर अक्षरशः मोबाईलचे व्यसन लागलं आहे. पण, सात्यत्याने मोबाइलला पाहणे आरोग्यासाठी हानिकारक असते. काही जण तर सकाळी झोपून उठल्यावर लगेचच मोबाईलवर स्क्रोलिंग करायला सुरवात करतात. पण, तुमची ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरू शकते.

दिवसातून ७० ते ८० वेळा विनाकारण उचलतात फोन –
एका संशोधनानुसार, ५० % लोकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. इतकंच काय तर भारतीय युझर्स कोणत्याही कारणाशिवाय उगाचच मोबाइल हातात घेतात. एका अहवालानुसार, देशातील सुमारे ८४ टक्के स्मार्टफोन वापरणारे झोपेतून उठल्यानंतर १५ मिनिटांत त्यांचे फोन तपासतात. याशिवाय या अहवालात असेही समोर आले आहे की, सुमारे ३१ टक्के लोकांचा सकाळचा वेळ स्मार्टफोनवर खर्च होतो आणि लोक दिवसातून सरासरी ८० वेळा त्यांचे फोन तपासतात.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, मोबाईल फोनमधून बाहेर पडणारी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फ्लिड अर्थात ईएमएफएस पचनशक्तीवर प्रतिकूल परिणाम करू शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दिवसभर पचन आणि ऊर्जेशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

सकाळच्या वेळी तीव्र ब्राईटनेस असलेला मोबाईलचा स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी आणि डोळ्यांना सूज येणे अशा समस्या जाणवू लागतात. तसेच सकाळी उठल्यावर मोबाइलला पाहण्याची सवय डोळ्यांचे आरोग्य खराब करू शकते.

- Advertisement -

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम, फोन स्क्रोल करून, आपण आपलें शरीर आणि मन पूर्णपणे सतर्क राहण्यास भाग पडतो. याशिवाय सकाळी वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचनात आल्याने अस्थिरता निर्माण होते. काम, सोशल मीडिया आणि बातम्यांच्या सातत्याने येणाऱ्या अपडेस्टने मानसिक दबाव वाढतो.

तुम्ही जेव्हा सकाळी उठल्यावर सोशल मीडिया, मेसेजेस तपासता तेव्हा तुम्ही इतर लोकांची मते, विनंत्या आणि जाहिराती यांकडे खेचले जाता. ज्याचा तुमच्या विचारसरणीवर परिणाम होतो. याशिवाय तुमचा अनमोल वेळही वाया जातो.

मोबाईलवर वेळ न घालवता दिवसाची सुरुवात अशी करा –

दिवसाची सूरूवात ध्येयाने करा.
जर तुम्हाला तुमचा दिवस चांगलं जावा असे वाटतं असले तर मोबाईल वापरण्याची सवय सोडून द्या.
सकाळी उठल्यावर पाणी प्या.
ध्यान किंवा मेडिटेशन करा.
व्यायाम करा.

 

 


हेही वाचा : हसा,हसवा,थट्टा, मस्करी करा पण जरा जपून

 

- Advertisment -

Manini