Wednesday, April 17, 2024
घरमानिनीHealthउशिरा उठण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात 'हे' आजार

उशिरा उठण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

Subscribe

दररोज सकाळी लवकर उठणे हे आपल्यापैकीच अनेक जणांसाठी कठीण काम असते. कितीही लवकर अलार्म लावला किंवा कितीही प्रयन्त केले तरी बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठणे कठीण होते. मात्र, तज्ञांच्या मते, सकाळी उशिरा उठण्याची सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. या सवयीचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

तज्ञांच्या मते, कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीने किमान ६ ते ८ तास झोपलेच पाहिजे. आजकाल बरेच लोक मध्यरात्रीपर्यत जागे राहतात. मात्र, रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे या सवयीमुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. उशिरा उठण्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या उदभवतात जाणून घेऊयात,

- Advertisement -

हार्ट प्रॉब्लेम –
सकाळी उशिरा उठल्याने सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे शरीरात हार्मोन्सची पातळी बिघडते. रक्तदाबाची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट प्रॉब्लेमचा धोका वाढतो.

डायबिटीस –
जर आपण उशिरा उठलो तर आपल्या दिवसाचे संपूर्ण चक्रही उशिराच सुरु होते. नाश्ता, जेवण यासर्वांचा वेळ बदलला जातो. सकाळी उशिरा उठल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे भुकेशी संबंधित समस्या वाढू लागतात. परिणामी, व्यक्तीचा आहार असंतुलित होतो आणि डायबिटीसचा धोका संभवतो.

- Advertisement -

हाय ब्लड प्रेशर –
अपूर्ण झोपेमुळे हाय ब्लड प्रेशरची शक्यता निर्माण होते. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांना इतर लोकांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका अधिक असतो. डॉक्टरांच्या मते, याने तुमची मेटाबॉलिझमची क्रिया विस्कळीत होते. ज्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते.

लठ्ठपणा –
ज्या लोकांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते, त्यांची मेटॅबॉलिझम क्रिया मंदावते. याने कॅलरी बर्न होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी, शरीरात फॅट्स जमा होतात आणि लठ्ठपणा वाढू लागतो.

पचन समस्या –
सकाळी उशिरा उठण्याने पचनशक्ती मंदावते. यामुळे पोट फुगणे, आम्लपित्त यासारख्या समस्या उध्दभवतात. कालांतराने, हा त्रास वाढल्याने मूळव्याध होण्याचा धोका निर्माण होतो.

 

 


हेही वाचा : डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

- Advertisment -

Manini