Saturday, June 10, 2023
घर मानिनी Religious बसल्या जागी पाय हलवणे आहे अशुभ; वैज्ञानिक कारणही आलं समोर

बसल्या जागी पाय हलवणे आहे अशुभ; वैज्ञानिक कारणही आलं समोर

Subscribe

आपल्यापैकी अनेकजण बसल्याजागी सतत पाय हलवत असतात. यावरुन अनेकदा आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून पाय न हलवण्याचा सल्ला देखील दिला जातो. मात्र, तरीही अनेकांची ही वाईट सवय सुटत नाही. पण तुम्हाला माहित आहे की, बसल्या-बसल्या सतत पाय हलवणं ज्योतिष आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही योग्य मानले जात नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार, बसल्यावर किंवा झोपून पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्र ग्रह अशुभ परिणाम देऊ लागतो. ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खराब होते. शिवाय मानसिक तणाव निर्माण होतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य बिगडते.

- Advertisement -

Why Do I Shake My Leg When I'm Sitting? | POPSUGAR Fitness

सतत पाय हलवल्याने देवी लक्ष्मी देखील अशा व्यक्तीवर नाराज होतात. ज्यामुळे व्यक्तीला धन संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. भाग्य देखील कमजोर होते.

पाय न हलवण्याचे वैज्ञानिक कारण

- Advertisement -

Why Do I Want To Bounce My Leg All The Time?

बसल्यावर किंवा झोपून पाय हलवल्याने अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता देखील निर्माण होते. मेडिकल सायन्समध्ये पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार असून या आजारामुळे हृदय, किडनी, पार्किन्सन्स वाढणे आणि शरीरात लोहाची कमतरता या समस्याही उद्भवतात.

 


हेही वाचा :

तुमचे पितर तुमच्यावर नाराज असल्याची ‘ही’ आहेत लक्षणं

- Advertisment -

Manini