Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthदररोज 'हे' काम करत असाल तर हृदयाचे आरोग्य बिघडेल

दररोज ‘हे’ काम करत असाल तर हृदयाचे आरोग्य बिघडेल

Subscribe

हेल्दी असणे फार महत्त्वाचे असते. सध्या हृदयासंबंधित आजाराची प्रकरणे फार वाढली आहेत. त्यापैकी एक म्हणजे हार्ट अॅटक. अशी काही कारणे आहेत त्यामुळे हृदय रोग वाढला जाऊ शकतो. यासाठी कारणीभूत म्हणजे अनहेल्दी खाणेपिणे, लठ्ठपणा आणि अन्य काही गोष्टी आहेत. आपण दररोज अशा काही सवयी फॉलो करतो ज्या हृदयरोगासाठी नुकसानदायक ठरु शकतात.

अशा काही सवयी ज्या तुमच्या हृदयाला नुकसान पोहचवू शकते
संपूर्ण दिवसभर बसून राहणे

- Advertisement -


अमेरिकन हार्ट असोसिएशनचे जर्नल मध्ये प्रकाशितच्या एका अभ्यासानुसार, प्रत्येक दिवशी पाच तासांपेक्षा अधिक बसल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

ओरल हेल्थची काळजी न घेणे

- Advertisement -


तुम्ही दररोज दात कमीत कमी दोन वेळा ब्रश केले पाहिजेत. असे केल्याने ओरल हेल्थ व्यवस्थितीत राहते. तुमच्या हिरड्यांना यामुळे नुकसान पोहचत नाही. मात्र ओरल हेल्थची काळजी न घेतल्यास बॅक्टेरियामुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. त्यामुळे सुद्धा हृदयरोग होण्याची शक्यता वाढू शकते.

अधिक मीठ खाणे


तुम्ही जेवणात गरजेपेक्षा अधिक मीठाचा वापर करत असाल तर हृदय रोग होण्याची शक्यता वाढते. कारण सोडियम हाय ब्लड प्रेशरचे कारण ठरू शकते आणि अन्य आजार ही निर्माण होऊ शकतात.

धुम्रपान


दररोज धुम्रपान केल्याने हृदयरोग होऊ शकतो. खासकरुन फुफ्फुसासंदर्भात तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.


हेही वाचा- ब्लोटिंगच्या समस्येवर किचनमधील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय

- Advertisment -

Manini