Monday, May 6, 2024
घरमानिनीRelationshipजॉइंट फॅमिलित राहण्याचे फायदे

जॉइंट फॅमिलित राहण्याचे फायदे

Subscribe

सध्याच्या काळात न्युक्लियर फॅमिलीचा फार वेगाने वाढत चालला आहे. एका छताखाली राहणे सध्याच्या जनरेशनला जमत नाहीयं. कारण त्यांना असे वाटते की, जॉइंट फॅमिलीत आपल्याला काही गोष्टी करण्यापासून अडवले जाऊ शकते. आपले स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकते. पण लोक हे विसरून जातात की, जॉइंट फॅमिलित राहणे हे एकटे राहण्यापेक्षा अधिक सुरक्षित असते.

न्युक्लिअर फॅमिलीला भले सध्या लोक सपोर्ट करत नसतील. पण येणाऱ्या समस्या आणि जबाबदाऱ्या नाकारल्या जाऊ शकत नाहीत. मुलं आनंदित रहावीत म्हणून पालक सुद्धा त्यांना लग्न झाल्यानंतर वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य देतात. जर तुम्हाला जॉइंटपेक्षा न्युक्लियर फॅमिलिचा कॉन्स्टेप्ट योग्य वाटत असला तरीही एकदा जॉइंट फॅमिलित राहण्याचे फायदे येथे जाणून घ्या.

- Advertisement -

Indian Joint Family System - Boon for A Child - Being The Parent

मजबूत सपोर्ट सिस्टिम
जॉइंट फॅमिलित राहण्याचा सर्वाधिक फायदा असा होतो की, कोणत्याही समस्या किंवा त्रासाचा सामना तुम्हाला एकट्याने करावा लागत नाही. त्याचसोबत प्रत्येक कठीण परिस्थितीत तुम्हाला परिवारातील लोकांचा सपोर्ट मिळतो. घरातील विविध जनरेशन आणि अनुभवांमुळे कोणत्याही समस्येत तुम्ही अधिक काळ अडकून राहत नाहीत.

- Advertisement -

जबाबदारी कमी होते 
एकटे राहण्याच्या नादात कपल्स हे विसरून जातात की, यासोबत अधिक जबाबदाऱ्या सुद्धा येतात. जर पार्टनर सपोर्टिव्ह नसेल तर सर्व गोष्टी मॅनेज करणे अत्यंत मुश्किल होते. अशातच जर तुम्ही जॉइंट फॅमिलित राहत असाल तर कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक चिंता करावी लागत नाही. कारण तुमच्या जबाबदाऱ्या घरातील अन्य सदस्य मिळून शेअर करतात.

आर्थिक समस्या न उद्भवणे
काही लोकांना वाटते की, जॉइंट फॅमिलित राहणे खर्चिक असते. मात्र वास्तवात असे नसते. यामुळे खर्च तुमचा कमी होतो. त्याचसोबत एखादी गोष्ट करताना तुम्हाला बँक बॅलेंन्स चेक करण्याची गरज नसते. कारण पैसे कमी पडल्यास घरातील अन्य मंडळी मदत तयार करण्यास तयार असतात.

मुलांवर उत्तम संस्कार होतात
असे मानले जाते की, ज्या मुलांना आजी-आजोबांची शिकवण मिळते ते अधिक संस्कारी असतात. त्यांना एखाद्याचा आदर कसा करायचा याची जाणी व असते. त्यांना योग्य आणि अयोग्य मधील फरक कळतो. त्याचसोबत अशा मुलांना कधीच ऐकटे वाटत नाही.


हेही वाचा- घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वभाव असा ओळखा

- Advertisment -

Manini