घरमहाराष्ट्रनागपूरभीषण अपघात! बुलढाण्यात भरधाव ट्रकने झोपलेल्या मजुरांना चिरडले; 3 जणांचा जागीच मृत्यू,...

भीषण अपघात! बुलढाण्यात भरधाव ट्रकने झोपलेल्या मजुरांना चिरडले; 3 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

Subscribe

अमरावती : बुलढाण्यात तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात झाला.हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला असून यात तीन मजुरांचा जागीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे मजूर रोजगारासाठी चिखलदरा तालुक्यातील मोरगावमधील 10 मजूर हे नांदुरामध्ये रस्त्याच्या कामासाठी आले होते. यावेळी महामार्गालगत असलेल्या झोपडीमध्ये झोपले असताना. आज पहाटेच्या सुमारास PB-11/CZ 40447 या आईसर भरधाव ट्रकने झोपडीतील झोपलेल्या मजुरांना चिरडले.

या अपघातात 26 वर्षीय तरुण प्रकाश बाबू जांभेकर व पंकज जांभेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 वर्षीय युवक अभिषेक रमेश जांभेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजा जादू जांभेकर आणि 25 वर्षीय दीपक खोजी बेलसरे हे अपघातात जखमी झाले आहेत. जखमींवर मलकापूर मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाची बेगडी ओबीसी जागर यात्रा…, विजय वडेट्टीवारांचे बावनकुळेंना 10 प्रश्न

या अपघातासंदर्भात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले, “आज पहाटे ट्रकने तीन मजुरांना चिरडल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात आम्ही तत्काळ स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून जखमी असलेल्या दोघांना तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. यानंतर जखमींना अमरावती येथील रुग्णालयावर शिफ्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासंदर्भात एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -