Tuesday, May 21, 2024
घरमानिनीBest places to chill out : फ्रेंडस् सोबत या ठिकाणी करा चील...

Best places to chill out : फ्रेंडस् सोबत या ठिकाणी करा चील आऊट

Subscribe

स्वप्ननगरी मुंबई, तुम्ही मुंबईकर असाल किंवा मुंबईत फिरायला आला असाल तर मुंबईत अनेक रमणीय ठिकाणी तुम्हाला पाहता येतात. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे तुम्ही पार्टनरसोबत मुवि नाईट्स, डिनर पार्टीचा प्लॅन करू शकता. जर तुम्ही मित्रांसमवेत मुंबई फिरण्याचा प्लॅन करत असाल तर येथे नाईट आऊटचे बरेच पर्याय आहे. उन्हाळा सुरु झालाय, शाळा कॉलेजच्या परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात, त्यामुळे फ्रेंड्सअसॊबत नाइटआउट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.

मुंबईत आल्यावर ती रात्री सुद्धा पाहावी असे कायम म्हटले जाते. त्यामुळेच मुंबईत फ्रेंड्ससोबत चील आउट करण्यासाठी बेस्ट ठिकाणे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

चील आउटसाठी बेस्ट ठिकाणे (Best places to chill out)

मरिन ड्राइव्ह (Marine Drive)

मुंबईत रात्री चील आउट करण्यासाठी मरिन ड्राइव्ह हा उत्तम पर्याय आहे. येथे सनसेट पाहण्यासाठी कायमच लोकांची गर्दी असते. तुम्ही जर पार्टनरसोबत जाणार असाल तर सुद्धा येथे तुम्हाला रात्री अविस्मरणीय वातावरण अनुभवयाला मिळेल. येथे असलेल्या दगडांवर बसून तुम्हाला मित्रांसोबत फोटोसेशन सुद्धा करता येईल.

छोटा काश्मीर (Chota Kashmir)

तुम्ही मुंबईत फ्रेंड्ससोबत छोटा काश्मीरला सुद्धा भेट देऊ शकता. गोरेगावमध्ये असलेले हे ठिकाण कपल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला तलावात बोटिंग करण्याचा अनुभव घेता येतो. तुम्हाला फ्रेंड्ससोबत निसर्गरम्य ठिकाणी जायचे असेल तर छोटा काश्मीरला नक्की भेट द्या.

- Advertisement -

वर्सोवा बीच (Versova beach) 

वर्सोवा बीच हे ठिकाण अंधेरीत आहे. या ठिकाणची खासियत सांगायची झाल्यास २. ७ किमीच्या खडकांनी बनलेला आहे. येथे सुद्धा तुम्ही फ्रेंड्ससोबत रात्रीचे चील आउट करू शकता. रात्रीची निरव शांतता तुम्हाला येथे अनुभवता येईल.

बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)

कस्टला डी अगुआडा म्हणजेच बांद्रयाचा किल्ला सुद्धा फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला उंचच उंच नारळाची झाडे दिसतील. येथे सुद्धा तुम्ही तासनतास मित्रांसोबत वेळ घालवू शकता.

 

 


हेही पहा :  अजबचं, या मंदिरातील मूर्ती बोलतात

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini