घरताज्या घडामोडीMumbai : बेस्टला 6 हजार कोटींचे अनुदान देण्यास काँग्रेसचा विरोध

Mumbai : बेस्टला 6 हजार कोटींचे अनुदान देण्यास काँग्रेसचा विरोध

Subscribe

बेस्ट उपक्रमाला अर्थसंकल्पीय तूट दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 6 हजार 600 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे ; मात्र पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, बेस्टला यापूर्वी पालिकेने दिलेल्या कोट्यवधीच्या निधीचा अद्याप हिशोब दिलेला नाही, असे कारण पुढे करीत बेस्टला पुन्हा एकदा थेट 6 हजार 600 कोटींचा निधी देण्यास विरोध दर्शवला आहे

बेस्ट उपक्रमाला अर्थसंकल्पीय तूट दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 6 हजार 600 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे ; मात्र पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, बेस्टला यापूर्वी पालिकेने दिलेल्या कोट्यवधीच्या निधीचा अद्याप हिशोब दिलेला नाही, असे कारण पुढे करीत बेस्टला पुन्हा एकदा थेट 6 हजार 600 कोटींचा निधी देण्यास विरोध दर्शवला आहे.वास्तविक, बेस्ट उपक्रम कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असून बेस्टला वाचवण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय तूट दूर करण्यासाठीच हा निधी देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नोव्हेंबरमध्येच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गैरसमज करून घेऊ नये, अशी सावध प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना दिली आहे.

त्यामुळे आता बेस्टला 6 हजार 650 कोटींचे अनुदान देण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी कर्ज, अनुदान स्वरूपात पालिकेने कोट्यवधी रुपये दिले आहेत. मात्र,बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून घेतलेल्या 4 हजार 450 कोटी रुपयांच्या निधीबाबत अद्यापही हिशोब दिलेला नाही. आता पुन्हा एकदा 6 हजार 650 कोटी रुपये निधी पालिकेकडून देण्यात येत आहे. त्यामुळे त्यास आपला विरोध आहे, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

वास्तविक, बेस्टचे 500 कोटी रुपये थकविणाऱ्यांकडून ती थकबाकी वसूल करायला हवी. तसेच, बेस्टकडे 330 एकर जमीन असून त्यांनी तिचा विकास करून तिचा वापर व्यवसायिक हेतूने करूम उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध करावे. अन्यथा त्या मालमत्ता पालिकेकडे द्याव्यात आणि पालिका त्यांचा विकास करून त्यातून बेस्टला उत्पन्न प्राप्त करून देण्यास सहकार्य करेल, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

बेस्टचा मागील अर्थसंकल्प हा 2 हजार 236 कोटी रुपयांनी तुटीचा असून ही तूट भरून काढणे, बेस्टवरील कर्जाचा बोजा कमी करणे, कर्मचाऱ्यांची थकबाकी देणे आणि नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करणे आदी कारणासाठी बेस्टला 6 हजार 650 कोटी रुपयांची गरज आहे, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने मांडली होती. तसेच, बेस्टला पालिकेने 6 हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालिकेतर्फे बेस्टला 6 हजार 650 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयएनएस रणवीर युद्धनौकेवरील स्फोटात 3 जवान शहीद, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -