दारू, ड्रग्सनंतर हेडफोन्सवर गाणी ऐकत केली जातेय नशा, हे Digital Drugs नेमकं आहे तरी काय?

दारू, ड्रग्सनंतर हेडफोन्सवर गाणी ऐकत केली जातेय नशा, हे Digital Drugs नेमकं आहे तरी काय?

दारू, ड्रग्सनंतर हेडफोन्सवर गाणी ऐकत केली जातेय नशा, हे Digital Drugs नेमक आहे तरी काय?

आजपर्यंत आपण नशा करण्यासाठी अल्कोहोल, कोकेन, भांग, चरस, गांजा आणि एलएसडी किंवा इतर काही पदार्थ खात असल्याचं ऐकलं आहे. मात्र आजच्या जीवनशैलीत लोकं मेंटल रिलिफसाठी डिजिटल ड्र्ग्स घेऊ लागलेत. तरुणाईत हा ट्रेन्ड सर्वाधिक आहे. त्यामुळे डिजिटल ड्रग्ज म्हणजे काय आहे आणि ते कसे असते जाणून घेऊ….

गाणी हा तर आजच्या तरुणाचा आवडता ट्रेन्ड आहे. प्रत्येक जण आपल्या सोईनुसार, आवड आणि सवडीनुसार गाणी ऐकण्याचा आनंद घेतात. भारतात तर विविध भाषेतील गाण्यांचा ट्रेन्ड वाढतोय. आणि तो ऐकणाऱ्यांना पण आवडतोय. मात्र यातील डिजिटल ड्रग अशी संकल्पना आहे ज्याला वैज्ञानिक बायनॉरल बीट्स (binaural beats) म्हणून ओळखे जाते. ही संगीतातील अशी एक श्रेणी आहे जी YouTube आणि Spotify सारख्या मीडिया प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल, हेडफोन्स आणि इंटरनेट कनेक्शनची गरज लागते. ज्यामाध्यमातून ऑडिओ ट्रॅक ऐकून नशा चढते.

बायनॉरल अर्थ दोन कान आणि बीट्सचा अर्थ ध्वनी अस होतो. बायनॉरल बीट्स हा एक विशेष प्रकारचा साऊंड आहे ज्यातून तुम्हाला दोन्ही कानात वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू येतात. यामुळे मेंदु कन्फ्युज होऊन दोन्ही आवाज एक करण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने मेंदूमध्ये आपोआप तिसरा आवाज तयार होतो जो फक्त आपणचं ऐकू शकतो. मेंदूच्या या एॅक्टिव्हिटीमुळे स्वत:ला शांत, हरवलेले आणि नशेच्या अवस्थेतील स्थितीत गेल्याचे जाणवते.

हेही वाचा : Health Tips : तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता का? आजच व्हा सावधान नाहीतर होतील ‘हे’ आजार

जर्नल ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यूमध्ये प्रकाशित संशोधनात शास्त्रज्ञांनी बायनॉरल बीट्सचा परिणाम शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी 30 हजार लोकांवर सर्वेक्षण करण्य़ात आले. यावेळी सहभागी लोकांमधील अंदाजे वय 27 वर्षे वयोगटातील 5.3 टक्के लोकांना बायनॉरल बीट्स ऐकणे आवडते. यातील पुरुषांचे प्रमाण 60.5 टक्के आहे. यातील चीन चतुर्थांश लोकांना हे आवाज ऐकल्यानंतर आरामदायी झोप येते. दरम्यान 34.7 टक्के लोक मूड बदलण्यासाठी बायनॉरल बीट्स ऐकतात आणि 11.7 लोक फिजिकल ड्रग्सचा प्रभाव रिप्लिकेट करण्यासाठी बायनॉरल बीट्सचा आधार घेतात.

दरम्यान बायनॉरल बीट्सद्वारे मनासारखी स्वप्न पडतात आणि डीएमटीसारख्या ड्रग्सचा प्रभाव वाढवण्यासाठी डिजिटल ड्रग्स सप्लिमेंट म्हणून घेतले जातात. सुमारे 50 टक्के लोकांना एक तास बायनॉरल बीट्स ऑडिओ ऐकणे आवडते तर 12 टक्के लोकांना 2 तासांपेक्षा जास्त काळ या डिजिटल ड्रग्समध्ये हरवणे आवडते. सध्या यूएस, मेक्सिको, ब्राझील, रोमानिया, पोलंड आणि यूकेमध्ये या डिजिटल ड्रग्सचे प्रमाण वाढत आहे. मात्र तरुणांमध्ये बायनॉरल बीट्सचे वाढते व्यसन पाहता यूएई आणि लेबनॉनसारख्या देशांनीही यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र हे लोण आता भारतातही पसरतेय. (health tips in marathi)

हेही वाचा : सावधान ! बॉडी बिल्डिंगसाठी तुम्ही घेत असलेल्या प्रोटीन पावडरमध्ये आहेत ‘हे’ १३० विषारी केमिकल्स

यावर मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे की, बायनॉरल बीट्स ऐकून लोकांच्या मूडमध्ये बदलण्यास मदत होत असून त्यांना खूप चांगले आरामदायी वाटते. मात्र हे हे बिट्स वारंवार ऐकल्याने लोकांना त्याची एकप्रकारे नशा होतेय. परंतु लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या याचा कितपत परिणाम होतो याचे फारसे संशोधन झाले नाही, परंतु तरीही पालकांनी मुलांच्या फोनवरील ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवावे असा सल्ला दिला आहे.

मात्र या डिजीटल ड्रग्सचा (Digital Drugs) तोटा म्हणजे त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी तरुणांना अल्कोहोल आणि गांजासारखी खरी ड्रग्स वापरण्याचा मोह होईल. यामुळे या दोन्ही ड्रग्सचा प्रभाव जाणून घेण्यासाठी चुकीचं पाऊल उचलू शकतात.


हेही वाचा: टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यातील तरुणाला एटीएसकडून अटक; अतिरेक्यांना पाठवले 10 हजार रुपये

First Published on: May 24, 2022 1:59 PM
Exit mobile version