घरच्या घरी बनवा केमिकल – फ्री ‘सनस्क्रीन’

घरच्या घरी बनवा केमिकल – फ्री ‘सनस्क्रीन’

प्रत्येकाने स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सध्याचं धावपळीचं आयुष्य आणि थकवा याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सर्वाधिक परिणाम हा चेहऱ्यावर दिसून येतो. मानवाच्या चेहऱ्याची त्वचा ही इतर शारीराच्या त्वचेपेक्षा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे तिची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सनस्क्रीन किंवा लोशन चेहऱ्याला लावले जातात. पण मार्केटमध्ये मिळत असलेली सनस्क्रीन किंवा लोशन सतत लावल्याने त्वचेवर डाग येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर का तुम्हाला मार्केट मधील सनस्क्रीन लावायची असेल तर तुम्ही घरच्या घरी केमिकल – फ्री सनस्क्रीन बनवू शकता आणि ते ही सोप्या पद्धतीने

सनस्क्रीन लावल्याने त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण मिळते. त्वचेची काळजी घेतली घेण्यास मदत होते. पण हेच सनस्क्रीन घरीसुद्धा द सहज बनविता येते.

हे ही वाचा – व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जावं की पार्कमध्ये जावं? या टिप्स नक्की वाचा

घरच्या घरी सनस्क्रीन बनविण्यासाठी साहित्य

बदाम तेल – 2 चमचे

शिया बटर – 1 चमचा

झिंक ऑक्साईड – 1 चमचा

कोकोआ बटर – 1 चमचा

व्हिटॅमिन ई कॅप्सूल – 1 चमचा
झिंक ऑक्साईडऐवजी तुम्ही कॅलामाइन पावडरच दखील तुम्ही वापर करू शकता. या सर्व गोष्टी व्यावस्थित एकजीव करून साठवून ठेऊ शकता. याचा नियमित वापर जेल्याने त्वचा तजेलदार होईल.

हे ही वाचा – बेकिंग सोड्याने घ्या चेहऱ्याची काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे घराबाहेर पडताना काही वेळापूर्वी सनस्क्रीन चेहऱ्याला लावणे फायदेशीर ठरू शकते. या सनस्क्रीनचा चेहऱ्यावर किंवा त्वचेवर परिणाम होण्यासाठी काही वेळ लागतो. त्यामुळे घराबाहेर पसताना हे सनस्क्रीन चेहऱ्याला हलक्या हाताने लावावे. बाहेरून पुन्हा घरी आल्यावर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

हे ही वाचा – अपूर्ण झोपेमुळे तुमच्या डोळ्यांनाही करावा लागू शकतो ‘या’ समस्यांचा सामना

 

First Published on: September 25, 2022 7:38 PM
Exit mobile version