Wednesday, May 8, 2024
घरमानिनीRecipeChicken Recipe: गटारी स्पेशल झणझणीत सुकं चिकन

Chicken Recipe: गटारी स्पेशल झणझणीत सुकं चिकन

Subscribe

गटारी अमावस्येनंतर श्रावण सुरु होतो. त्यामुळे यंदा अधिक मास आल्याने दोन महिने तरी नॉन-व्हेज खाता येणार नाही. अशातच तुम्ही यंदाच्या गटारीला स्पेशल असे झणझणीत चिकन नक्की करुन पहा. चला तर पाहूयात साहित्य आणि कृती.

साहित्य: 

- Advertisement -

-अर्धा किलो चिकन
-2 टिस्पून धणे पावडर
-2 टिस्पून जीर पावडर
-4 चमचे लाल तिखट
-3 चमचे चिकन मसाला
-अख्खा गरम मसाला
-2 चमचे हळद
-2 चमचे कश्मिरी मिर्च पावडर
-2 बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिर्च्या
-4 बारीक चिरलेला कांदा
-3 बारीक चिरलेले टोमॅटो
-2 चमचे आलं-लसूण पेस्ट
-200 ग्रॅम दही
-पुदीना
-कोथिंबीर
-लिंबाचा रस
-चवीनुसार मीठ
-तेल

- Advertisement -

कृती: 

अर्धा किलो चिकन सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, अर्धा चमचा मीठ, लाल तिखट आणि हळद टाका. त्यानंतर 3-4 चमचे दही टाका. आता हे सर्व मिश्रण एकत्रित करा. असे केल्यानंतर चिकनला अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवून द्या. पुढील स्टेप मध्ये गॅसवर एका पॅन मध्ये 4-5 चमचे तेल टाकून ते थोडं गरम होऊ द्या. त्यात आता अख्खा गरम मसाला टाका. तो थोडा भाजल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा थोडा गुलाबी होई पर्यंत शिजू द्या. त्यात आता आलं-लसूणंची पेस्ट टाका. ती व्यवस्थितीत भाजल्यानंतर त्यात बारीक चिरलेले टोमटो टाका. टोमॅटो हे पूर्णपणे शिजू द्या. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, कश्मिरी मिर्ची पावडर, धणे पावडर, जीर पावडर, चिकन मसाला टाका. हे सर्व मसाले तेलात व्यवस्थितीत भाजू द्या. मसाले तेलात भाजल्यानंतर त्यात दही टाका आणि पुन्हा मसाले त्यात एकत्रित करा. हा सर्व मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट झालेले चिकन घाला. चिकन मसाल्यात परतून घेताला त्यात चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर टाका. चिकन परतल्यानंतर त्यात हवं असेल तर थोडं पाणी आणि मीठ टाका. चिकन लवकर शिजावे म्हणून त्यावर झाकणं ठेवा. चिकन शिजण्यासाठी जवळजवळ 25-30 मिनिटे ठेवा. अर्धा तासानंतर तुमचे झणझणीत असे सुकं चिकन तयार. पॅन मधील चिकन एका बाउलमध्ये काढून त्यावर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. असे गटारी स्पेशल चिकन तयार. ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करुन पहा.

 

 

- Advertisment -

Manini