Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthलहान मुलांना कोणत्या वयात द्यायचं Chicken

लहान मुलांना कोणत्या वयात द्यायचं Chicken

Subscribe

प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले ही आयुष्यभर निरोगी रहावे, असे वाटत असते. मग, मुलांना ब्रेस्टफीडिंगपासून ते मुलांना कोणता आहार द्यावा, इथपर्यंत पालक हे त्यांच्या मुलांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात. डॉक्टर सांगतात की, नवजात बालके सहा महिन्यापर्यंत कोणता आहार देण्यास सुरुवात केली पाहिजे. लहान बाळांना आहार देताना जास्त लक्ष दिले पाहिजे. बालकांना सुरुवातीला खिचडी, दलिया, डाळींचे पाणी, ओट्स, पोहा आणि अन्य खाद्यपदार्थ दिले जातात. हे सर्व पदार्थ लवकर पचतात. यामुळे नवजात बालकांची पचनक्रिया मजबूत होते. नवजात बाळांना जेवण देताना आईच्या मनात नेहमी प्रश्न येतो की, बाळा चिकन आणि मटण खाण्यास देऊ शकतो का? आणि ते कधी असे अनेक प्रश्न आईला पडतात. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, लहान मुलांना चिकन आणि मटण हे कोणत्या वयात देण्यास सुरुवात झाली पाहिजे.

लहान मुलांना चिकन आणि मटण कधी द्यावे

लहान मुलांना 7 ते 8 महिन्यानंतर तुम्ही त्यांच्या आहारात चिकन किंवा मटण देणे सुरू करू शकता. जेव्हा बाळा आहार देणे सुरू करतो. तेव्हा त्यांच्या आहारात चिकन किंना मटणचा समावेश केला जाऊ शकतो. लहान मुलांना तुम्ही चिकन सूप प्याला देऊ शकता. तुम्हा लहान मुलांना अंडे आणि मासेसारख्या खाद्यपदार्थ समावेश करू शकतात.

- Advertisement -

लहान मुलांना एक दिवस किती चिकन देऊ शकता

7 ते 8 महिन्यांच्या लहान मुलांना एक दिवसात किती चिकन किंवा मटण देण्याची किती द्यावे, हा प्रश्न सर्व पालकांच्या मनात येतो. नवी दिल्लीचे ऑर्थोक्लीनिकमध्ये प्रॅक्टिस करणारे आहार तज्ञ दीपिका अग्रवाल हे सांगतात की, 7 ते 8 माहिन्याच्या बाळांना एक दिवसात 1 चमचा चिकन प्युरी दिली जाऊ शकते. मुलांच्या वयासोबत चिकन किंवा मटण यासारखे मांसाहारचे प्रमाणात वाढ करू शकता.

मुलांना चिकन खाऊ घालण्याचे फायदे

  • चिकन प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्सने भरपूर प्रामाणात असतात. चिकनमध्ये कैल्शियम, आयरन मॅग्नीशियम, फास्फोरम, पोटेशियम, सोडियम, झिंक, कॉपर आणि मँगनीज असते.
  • शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बाळाला झिंक आणि लोहाची सर्वाधिक गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आईच्या दुधात लोहाचे प्रमाण आढळत नाही, म्हणून ते पुरवण्यासाठी मांस किंवा कोंबडीचे सेवन केले जाऊ शकते.
  • चिकनमध्ये कॉपर आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. याचाच अर्थ असा की, मुलाला कोंबडी किंवा मांस खायला दिल्यानेही पुरेसे पोषण मिळू शकते.
  • जर मुलाला भाजीपाला आणि दलियासह मांसाची प्युरी दिली तर त्याला अॅनिमियासारखा आजार होत नाही.
  • बाळासाठी चिकन कसे शिजवायचे
  • जर तुम्ही 7 महिन्यांनंतर बाळाला चिकन किंवा कोणतेही मांस देत असाल तर ते पूर्णपणे शिजवल्यानंतर प्युरीच्या स्वरूपात द्या.
  • बाळाला चिकन देताना, ते शिजवताना जास्त मसाले, कांदा, लसूण वापरलेले नाहीत याची काळजी घ्या.
  • बाळासाठी नेहमी हाडे नसलेले चिकन वापरा. आपण बोनस चिकन शिजवल्यास, तुकडे पुरीमध्ये राहू शकतात.
  • तुमच्या बाळाला उकडलेले मांस, चिकन, मासे किंवा अंडी कधीही देऊ नका.
- Advertisment -

Manini