आजारांचा सामना करण्यासाठी हिवाळ्यात करा ‘या’ 4 प्रकारच्या लाडवांचे सेवन

हिवाळ्यात वातावरणात प्रचंड गारठा असतो. त्यामुळे शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात अनेकजण विविध पौष्टिक लाडवांचे देखील सेवन करतात. यांचे सेवन केल्यास कॅल्शियम, व्हिटॅमीन्स आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते.

थंडीत करा ‘या’ लाडवांचे सेवन

मेथीचे लाडू

Methi ladoo. recipe by Sonali Belose-Kayandekar in Marathi at BetterButterअनेकजण गुडखे दूर करण्यासाठी मेथीच्या लाडवांचे सेवन करतात. मेथीमध्ये व्हिटॅमीन ए.बी.सी, आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम असतात. जे वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर आहे. या लाडवाचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.

डिंकाचे लाडू

Dinkache Che Laddoo | पौष्टीक डिंकाचे लाडू | Lokmat.comडिंकांच्या लाडवांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. यामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात. तसेच हे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण भरुन काढते.

तीळाचे लाडू

Tilache Ladoo | Tilgul | तिळाचे लाडू | Sankrant Special Recipe | Til Ladoo  | Sesame Seeds Ladoo - YouTubeतीळा गरम असतात त्यामुळे ते थंडीत मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तीळाच्या लाडवाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामध्ये व्हिटॅमीन्स , आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ड्राय फ्रुट्सचे लाडू

पौष्टिक ड्राई फ्रूट लड्डू | Dates Dry Fruit Laddu | Healthy Dates Dry Fruit  Laddu - YouTube हिवाळ्यात ड्राय फ्रुट्सचे लाडू खाल्लाने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

 


हेही वाचा :

Recipe : पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून तयार करा अंडाभजी