Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthरात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने होऊ शकते नुकसान...

रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने होऊ शकते नुकसान…

Subscribe

दूध पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. दररोज एक ग्लास तरी दूध नक्कीच प्यायला हवं. कारण दूधाला एक परिपूर्ण आहार मानला जातो आणि यामध्ये जवळपास प्रत्येक प्रकारचे पोषक तत्व आढळतात. याला कॅल्शियम आणि प्रोटीनचे मुख्य स्त्रोत मानले जाते. सोबतच हे प्यायल्याने व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन बी देखील मिळते. मात्र, अनेकजण दूधाचे सेवन रात्री झोपण्यापूर्वी देखील करतात. परंतु रात्री दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

रात्री झोपण्यापूर्वी दूधाचे सेवन केल्यास काय होते?

- Advertisement -

10 Benefits Of Drinking Milk At Night - Drink Milk At Night - Fittify

 

- Advertisement -
  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी कधीही दूधाचे सेवन करु नये. कारण दूध प्यायल्यानंतर आपण लगेच झोपतो. त्यामुळे ते दूध पचायला जड जाते.
  • जेवल्यानंतरही कधी लगेच दूध पिऊ नये. जर तुम्हाला रात्री दूध प्यायचे असेल तर झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी प्यावे.
  • रात्री लिव्हर शरीरामध्ये डिटोक्सीफिकेशनचे काम करते. परंतु जर रात्री दूध प्यायल्यास लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे तुम्हाला लिव्हर संबंधित समस्या निर्माण होऊ शकते.
  • रात्री झोपण्यापूर्वी दूधाचे सेवन केल्यास तुमचे वजन देखील वाढू शकते.

हेही वाचा :

रात्री बेरात्री उठून खाता, मग व्हा सावध

- Advertisment -

Manini