घरफोटोगॅलरीPHOTOS: ठाकरेंच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी; मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रातील मोदी सरकार निशाण्यावर

PHOTOS: ठाकरेंच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी; मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रातील मोदी सरकार निशाण्यावर

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ठाकरे म्हणाले की, मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकलं आहे की रावणही शिवभक्त होता. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. एक खबरदारी त्यांनी घेतली आहे की त्यांनी आपला धनुष्यबाणही चोरला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (PHOTOS Huge crowd at Uddhav Thackeray s rally Chief Minister eknath Shinde and the Modi government at the center are on target)

- Advertisement -

जातीला पोट असतं पण पोटाला जात नसते, आणि सगळ्याचं पोट भरण्याची जबाबदारी राजकर्त्यांची असते. आज तिकडे काही जमलेत, मेळावा घेतायंत, बोला आमच्यावर टीका करा आम्ही तुम्हाला महत्व देत नाही. कारण, माझ्यासमोर महाराष्ट्रातील हा गोरगरीब आहे. राज्यात आज जातीपातीच्या भिंती उभ्या करून झिंजवण्याचे कारस्थान भाजप करतेय त्यांना आपल्याला मोडून तोडून टाकायचे आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला.

- Advertisement -

ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो भाजप कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, 35 पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण निघताना नवरा-बायकोत भांडण लावून निघणार असली ही भाजपची अवलाद आहे असल्याचे म्हणत त्यांनी नाव न घेता फडणवीसांना टोला लगावला.

भाजप भाजपा असो की, त्याकाळातला जनसंघ असो. यांचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात ते नव्हते, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचे नाव ऐकले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? आयतं अन्न शिजतंय चला हात मारू म्हणून आले. सगळ्यात शेवटी हे आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

(हेही वाचा: PHOTOS : शिवसेनेच्या दसरा मेळाव्या लोटला जनसागर; आझाद मैदानावरून शिंदेंनी सोडले टीकेचे बाण )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -