Friday, May 17, 2024
घरमानिनीकाकडी खाण्याचीही असते योग्य वेळ?

काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ?

Subscribe

काकडी खाल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. काकडीत व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक असतात. काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच पण, काकडी चुकीच्या वेळी सेवन केल्यास शरीराच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे काकडी योग्य वेळीच खावी. जाणून घेऊयात काकडी खाण्याचे फायदे आणि काकडी खाण्याची योग्य वेळ ,

काकडीचे अगणित फायदे –

काकडीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काकडीचे सेवन करायला हवे.

- Advertisement -

काकडीचे सेवन हार्टसाठी फायदेशीर मानले जाते. कारण काकडीच्या सेवनाने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते.

डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे कमी व्हावीत यासाठी डोळ्यांवर काकडीचे काप कापून ठेवा. यामुळे डोळ्यांखालील असलेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.

- Advertisement -

काकडीमध्ये व्हिटॅमिन के असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत करण्यासाठी काकडीचे सेवन फायदेशीर मानले जाते.

काकडीमध्ये जास्त कॅलरी असतात. काकडीमध्ये वजन वाढवणारे घटक नसल्याने काकडी खाल्याने वजन वाढत नाही. तसेच काकडी खाल्याने पोटही भरलेले राहते. ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही कमी खाता, ज्याने वजन नियंत्रणात राहते.

काकडी नियमित खाल्यास केसांची वाढ उत्तमरीत्या होते.

काकडी खाण्याची योग्य वेळ –

काकडी खाण्याची योग्य वेळ म्हणजे काकडी दिवसा खाणे. यासह रिकाम्या पोटी काकडी खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. काकडी तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि फ्रेश ठेवण्यास मदत करते. दिवसा काकडी खाल्याने मेटॅबॉलिझमची गती वाढते आणि पोटाच्या समस्याही दूर होतात. सर्वत महत्वाचे म्हणजे रात्री काकडी खाऊ नये. रात्री काकडी खाल्याने कफ वाढू शकतो. इतकंच नाही तर त्याचा प्रभावही थंड असतो. यामुळेच रात्री काकडी खाल्ल्याने फुफ्फुसात कफ जमा होऊन तुम्हाला खोकल्याचा त्रास सुरु होऊ शकतो. एकंदरीतच, तुम्ही रात्री काकडीचे सेवन करणे टाळायला हवे.

 

 

 


हेही पहा : उन्हाळ्यात कांदा का खावा?

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini