Sunday, April 28, 2024
घरमानिनीकाकडीच्या सालींपासून असे बनवा ऑरगॅनिक खत

काकडीच्या सालींपासून असे बनवा ऑरगॅनिक खत

Subscribe

घराघरात काकडीची कोशिंबीर केली जाते किंवा काकडी सलाड म्हणूनही खाण्यात येते. मात्र, काकडीची साल काढल्यानंतर ती अनेकदा डस्टबीनमध्ये फेकण्यात येते. तथापि,काकडीच्या सालीमध्ये पोटँशियम, मॅग्निशियम आणि सिलिकासारखी अनेक मिनरल्स असतात. जी इतर कामांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. काकडीची साल त्वचेपासून ते झाडांच्या चांगल्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.

काकडीच्या सालींपासून ऑरगॅनिक खत तयार होऊ शकते. काकडीच्या सालीचे ऑरगॅनिक खत घरीच तयार करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्चही लागत नाही. बाहेरून विकत आणलेल्या खतामुळे अनेकदा झाडांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. झाडांवर विपरीत परिणाम होण्यापेक्षा घरी बनवलेले ऑरगॅनिक खत केव्हाही उत्तम…

- Advertisement -

काकडीच्या सालीपासून खत कसे तयार कराल –

  1. काकडीच्या सालीपासून खत तयार करण्यासाठी सर्वप्रथम काकडीची साल गोळा करून उन्हात वाळवावी लागेल.
  2. सालीतील सर्व ओलावा काढून टाकल्यानंतर, साली एक भांड्यात ठेवा.
  3. काकडीच्या साली आता तुम्हाला जाळून घ्यायच्या आहेत.
  4. काकडीच्या जळालेल्या सालींपासून तयार झालेली राख आता गोळा करा.
  5. तयार राख तुम्ही झाडांसाठी खत म्हणून वापरू शकता.

- Advertisement -

काकडीच्या सालीपासून बनवलेल्या खताचे फायदे –

  1. काकडीच्या सालींमध्ये 11% फॉस्फरस आणि 27 % पोटॅशियम असते. जे झाडाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
  2. काकडीच्या सालीपासून बनवललेया खताचा तुम्ही वापर केल्यास तुम्हाला काही दिवसातच त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
  3. सालीपासून बनवलेल्या खतामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते.
  4. घरबसल्या तयार होणाऱ्या या खतामुळे तुम्हाला पैसेही लागत नाही.
  5. बाजारात उपलब्ध असलेल्या खतांच्या तूलनेत काकडीच्या सालीपासून बनवलेले खत अधिक फायदेशीर ठरू शकते.
  6. काकडीच्या सालीपासून बनवलेले खत पूर्णपणे नैसर्गिक असते ,त्यात कोणतेही केमिकल नसल्यामुळे झाडांवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

 

 

 

 


हेही वाचा : रोज पाणी टाकूनही तुळस सुकतेय? मग ‘हे’ उपाय करा

 

- Advertisment -

Manini