Saturday, May 18, 2024
घरमानिनीसावधान! शरीरात पाण्याची कमतरता असल्यास होऊ शकतात 'या' समस्या

सावधान! शरीरात पाण्याची कमतरता असल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या

Subscribe

चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबतच पुरेसे पाणीही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीरातील अनेक समस्या पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यानेच दूर होतात. उन्हाळ्यात जर आपण नियमितपणे पुरेसे पाणी प्यायलो तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे जाणवते. ज्यामुळे अनेकांना, उन्हाळ्यात डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची लक्षणे

16 Reasons Why Water Is Important to Human Health

- Advertisement -

शरीरात पाणी कमी होण्याची लक्षणे गांभीर्याने घ्यायला हवी. डिहायड्रेशनमुळे तहान, कोरडे तोंड आणि थकवा येऊ शकतो. तसेच गंभीर शारीरिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

  • थकवा जाणवणे

Dehydration and hot weather - MyDr.com.au

- Advertisement -

डिहायड्रेशनमुळे थकवा, अशक्तपणा येतो. जर तुम्हाला सतत थकवा आणि सुस्त वाटत असेल, तर तुमच्या शरीराला जास्त पाण्याची आवश्कता आहे.

  • लघवीचा रंग बदलणे

How Bladder Problems Cause Dizziness - Vertigo Detective

जर तुम्हाला गडद लघवी येत असेल तर हे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे. जर तुमचा लघवी गडद पिवळ्या रंगाचा असेल तर याचा अर्थ तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

  • चक्कर येणे

Dehydration causes water retention - Times of India

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही चक्कर देखील येते. तुम्हालाही अचानक चक्कर येत असल्यास, हे पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते.

  • डोकेदुखी

How to Tell If You Are Dehydrated: Symptoms and Treatment

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर तुम्ही भरपूर पाणी प्यावे.

  • कोरड पडणे

Dehydration: do we really know how to spot it? - Evidently Cochrane

जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा अचानक तोंड कोरडे पडू लागते. यासोबतच तोंडाला चिकटपणा जाणवतो. अशा सतत पाणी प्यावे.

 


हेही वाचा :

PCOS- रेग्युलर पिरियड म्हणजे ऑल इज वेल असं नाही?

- Advertisment -

Manini