Sunday, December 3, 2023
घरमानिनीRelationshipमुलांमध्ये नैराश्याचे 'हे' आहेत संकेत

मुलांमध्ये नैराश्याचे ‘हे’ आहेत संकेत

Subscribe

आधुनिक काळात बदलत्या लाइफस्टाइलमुळे लहान मुलांना सुद्धा आरोग्यासंबंधितच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लहान मुलं ही डिप्रेशनमध्ये जात आहेत. याची प्रकरणे गेल्या काही काळापासून वाढत चालली आहेत. यामुळे पालकांना मुलांची अधिक चिंता सतावू लागली आहे.

हसती-खेळती मुलं प्रत्येकालच आवडतात. मात्र मुलं अधिक शांत-शांत, एकटी राहत असतील तर त्यांच्या मनात काहीतरी चाललेले असते हे नक्की. मात्र ते कसे ओळखायचे आणि ते खरंच नैराश्याचा सामना करतायत का याच बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.

- Advertisement -

-उदास राहणे
जर तुमचे मुलं काही आठवडे आणि महिने उदास राहत असेल अथवा एकटे राहणे पसंद करत असतील तर समजून जा त्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय. अशावेळी मुलाकडे लक्ष देणे फार गरजेचे असते.

-स्वत:शी बोलणे
जर तुमचे मुलं स्वत: शीच बोलत असेल, एकट्यातच काहीतरी पुटपुटत असेल किंवा अचानक गोष्टी फेकून देत असेल तर पालकांनी समजून जावे तो डिप्रेशन मध्ये आहे.

- Advertisement -

-खाण्यापिण्याकडे आणि झोपण्यात बदल
मुलं दीर्घकाळापासून व्यवस्थितीत खात-पितं नसेल किंवा झोप ही त्याची पूर्ण होत नसेल तर तो एका समस्येत असू शकतो. अशावेळी पालकांनी त्याच्याशी बोलले पाहिजे.

मुलांना डिप्रेशनच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्याच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. त्याच्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल ही विचारले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाशी मित्रत्वाचे नाते तयार केले पाहिजे. तरच तो तुमच्याशी सर्वकाही गोष्टी शेअर करू शकतो.


हेही वाचा- आईवडिलांकडून मिळणाऱ्या 9 वाईट सवयी

 

- Advertisment -

Manini