Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthडिप्रेशनमधून स्वतःला कसं सावरायचं?

डिप्रेशनमधून स्वतःला कसं सावरायचं?

Subscribe

बदलत्या आणि धावपळीच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. दिवसभर त्याच गोष्टींचा विचार केल्याने आणि काळजीत राहिल्याने व्यक्तीच्या आयुष्यात स्ट्रेस निर्माण होतो. ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होत असतो. सतत स्ट्रेसफुल आणि अस्वस्थ राहिल्याने व्यक्ती हळूहळू कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता गमावू लागते. परिणामी, व्यक्ती कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आणि हळूहळू व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते.

डिप्रेशन म्हणजे काय?
डिप्रेशन एक मूड डिसॉर्डर आहे. ज्यात माणसाला दुःख, राग आणि एकटेपणा जाणवू शकतो. एकाच समस्येवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित केल्याने डिप्रेशन येऊ लागते. दीर्घकाळ डिप्रेशनमध्ये राहिल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावरही दिसू लागतो.

- Advertisement -

डिप्रेशनमुळे काय होते ?

1.सतत मूड स्विंग होण्याच्या समस्येतून जावे लागते.
2.छोट्याछोट्या गोष्टींमुळे चिडचिड होते.
3.कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित होत नाही.
4.झोपेची समस्या जाणवते. निद्रानाशेच्या समस्येचा सामना करावा लागतो.
5.शरीरात वेदना जाणवू लागतात. यात डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या समस्यांना समावेश असतो.
6.सामाजिक वर्तुळ कमी होऊ लागते.

- Advertisement -

डिप्रेशनमध्ये असताना पुढील कामे करू नये –

स्वतःला कोंडून घेऊ नका –
जर तुम्ही कोणत्या समस्येशी झुंज देत असाल तर स्वतःला कोंडून ठेऊ नका. असे केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. डिप्रेशनमधून बाहेर निघायचे असले तर बाहेर पडा. जर लोकांशी बोलायला जमत नसेल तर फ्रेश हवा आणि सकाळचा सूर्यप्रकाश तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर निघण्यास उपयोगी पडेल.

स्वतःची तुलना इतरांशी करू नका –
जीवनात अपशयाला सामोरे जावे लागते अशावेळी अपयशातून शिकून पुढे जाण्याचा प्रयन्त करा. शिकून पुढे जा. सोशल मीडियावर वेळ घालवणे टाळा. इतरांनुसार तुमचे आयुष्य बदलण्याचा विचार करू नका. स्वतःची तुलना इतरांशी करू नका.

समस्यांपासून पळू नका –
आयुष्यात कोणतीही समस्या आली तर त्याला तोंड द्यायला शिका. समस्यांपासून दूर पळून कोणतीही समस्या सुटणार नाही उलट समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सकारात्मकपद्धतीने जीवनाला दिशा द्या. एखाद्याने केलेला विश्वासघात किंवा आपल्या वाट्याला आलेले अपयश याबद्दल सतत विचार करणे तुमचे मानसिक स्वास्थ बिघडवते. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा.

सतत घरात अंथरुणावर पडून राहू नका –
डिप्रेशनला बळी पडलेला व्यक्ती प्रत्येक क्षणी त्याच्या समस्येला घेऊन चिंतेत असतो. अशा परिस्थितीत, बहुतेक जण बेडवर लोळत पडण्याचा मार्ग स्वीकारतात आणि दिवसरात्र त्याच गोष्टींचा विचार करतात. पण, असे केल्याने कोणत्याही समस्येवर मार्ग निघत नाही. उलट निद्रानाशेची समस्या भेडसावते. अशा परिस्थितीत, दिवसभरातील थोडावेळ काढून तुम्ही व्यायाम किंवा बाहेर फिरायला जायला हवं. अशाने तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर निघायला मदत होईल.

 

 


हेही वाचा : ऊठसूट शॉपिंग, मानसिक आजाराचं लक्षण

 

- Advertisment -

Manini