Friday, May 3, 2024
घरमानिनीFashionदसऱ्यानिमित्त विद्या बालनसारखे 'हे' लूक्स करा रिक्रिएट

दसऱ्यानिमित्त विद्या बालनसारखे ‘हे’ लूक्स करा रिक्रिएट

Subscribe

बॉलिवूड मधील अभिनेत्री विद्या बालन आपल्या देसी अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती बहुतांश फंक्शनला साडीत दिसते. तिच्याकडील साड्यांचे कलेक्शन प्रत्येकालच आवडते. अशातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही जर पारंपरिक लूक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर विद्या बालनचे पुढील काही आउट्फिट्स नक्की रिक्रिएट करून एक नवा लूक करू शकता.

-चंदेरी सिल्क साडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -


विद्याने रेड अॅन्ड व्हाइट हँन्ड प्रिंटेड चंदेरी सिल्क साडीला सिंपल फॉल पल्लू स्टाइलमध्ये प्रिंटेड ब्लाउजसह ड्रॅप केले आहे. रेड बोल्ड लिपस्टिकमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

-प्रिंटेड साडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -


विद्याने प्रिंटेड साडीला डीप राउंड नेक ब्लाउजसह वेअर केले आहे. आउटफिच्या बॉर्डरची लेस डिटेलिंग याला अॅक्ट्रॅक्टिव्ह बनवत आहे.

-बनारसी साडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)


या फोटोत विद्याने पिवळ्या रंगाची बनारसी साडी नेसली आहे. आउटफिटला तिने चोली कट प्लेन ब्लाउजसह स्टाइल केले आहे. अभिनेत्रीने कानात गोल्डन टॉप्स आणि हाता गोल्डन बांगड्या घातल्या आहेत.

-फ्लोरल साडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)


फ्लोरल प्रिंटेड मरुन साडीत विद्या अत्यंत सुंदर दिसून येत आहे. आउटफिटला तिने मॅचिंग फुल स्लीव्स ब्लाउजसह टीमअप केले आहे.

-मिरर वर्क साडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)


लाल रंगातील मिरर वर्क साडीत विद्याने हायनेक ब्लाउज घातले आहे. अभिनेत्रीने गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे. आपला लूक परफेक्ट करण्यासाठी तिने लो पोनीटल हेअर स्टाइल केली आहे.


हेही वाचा-  वेलवेटच्या कपड्यांची अशाप्रकारे घ्या काळजी

- Advertisment -

Manini