Friday, May 10, 2024
घरमानिनीHealthसकाळी उपाशीपोटी लवंग खाण्याचे फायदे

सकाळी उपाशीपोटी लवंग खाण्याचे फायदे

Subscribe

लवंग हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. त्यात काही आयुर्वेदिक गुण असतात. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन, फाइबर, प्रोटीन, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरोस, मॅग्नीज कार्बोहाइड्रेट आणि अँन्टीऑक्सिटेंड्स मिळतात. जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी लवंग चावून खाल्ल्यास तर आरोग्यासाठी कोणते फायदे होतात हे पाहूयात.

-रोगप्रतिकारकशक्ती होते बूस्ट
कोरोनाच्या परिस्थितीनंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय केले जातात. जेणेकरुन एखाद्या संक्रमणापासून दूर राहता यईल. ऋतूत बदल, पाऊस आणि उन्हाळ्यात सर्दी, खोकला सारखे आजार होतात. जर तुम्ही सकाळी उठून लवंग चावून खाल्लेत तर शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढली जाते.

- Advertisement -

-यकृतासाठी फायदेशीर
यकृत आपल्या शरीरातील काही फंक्शन्स पार पाडतो. त्यामुळे या अवयवयाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. लवंग खाल्ल्याने यकृताचे आरोग्य सुधारले जाते.

-तोंडाची दुर्गधी दूर होते
लवंगाचा वापर हा नैसर्गिक माउथ फ्रेशनरच्या रुपात केला जाऊ शकतो. काही वेळेस तोंड स्वच्छ करून ही त्यामधून दुर्गंधी येते. लवंगात अँन्टी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे दररोज तुम्ही लवंग चावून खाल्ल्यास तोंडातील बॅक्टेरिया दूर होतात.

- Advertisement -

-दात दुखीपासून सुटका
जर तुम्हाला अचानक दात दुखीची समस्या उद्भवली तर पेन किलर नव्हे तर लवंगाचा तुकडा दाताखाली ठेवावा. जेणेकरुन दात दुखीच्या समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता.


हेही वाचा- गरम मसाल्याचे पदार्थ अधिक खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ नुकसान

- Advertisment -

Manini