Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthगरम मसाल्याचे पदार्थ अधिक खाल्ल्याने होऊ शकतात 'हे' नुकसान

गरम मसाल्याचे पदार्थ अधिक खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ नुकसान

Subscribe

इंडियन किचनमध्ये मसाले हमखास वापरले जातात. त्यामुळे काही पदार्थ तयार करताना आपण त्यात मसाले वापरतो आणि पदार्थाची चव वाढली जाते. अशातच काही मसाल्यांचा वापर करुन हर्बल टी सुद्धा तयार केली जाते. जी इम्युनिटी बूस्ट करण्यास फायदेशीर ठरतात. खोकला, सर्दी, व्हायरल इंन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहता. भले याचे फायदे होतात. पण गरम मसाल्यांचे पदार्थ अधिक खाल्ल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

पोटासंबंधित समस्या
गरम मसाल्यांचे अधिक सेवन केल्याने पोटासंबंधित अधिक समस्या उद्भवू शकते. पोटात जळजवळ, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला आधीच पचनासंबंधित समस्या असेल तर गरम मसाल्यांचे पदार्थ अजिबात खाऊ नका.

- Advertisement -

उलटी होऊ शकते
काही हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, गरम मसाल्यांमध्ये मिर्च, लवंग धणे, मोठी वेलची आणि लहान वेलची याचा समावेश असतो. त्यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जसे की, उलटी होणे, बैचेन झाल्यासारखे वाटणे असे.

- Advertisement -

हृदयासाठी हानिकारक
गरम मसाल्यांचे अधिक सेवन केल्याने तुम्हाला हृदयासंबंधित आजार उद्भवू शकता. यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका वाढतो. अखेर ते हृदयाच्या आरोग्याचे कारण ठरू शकते. हार्ट पेशंटने गरम मसाल्यांच्या पदार्थांचे सेवन करू नये.

ओरल हेल्थवर परिणाम
गरम मसाल्यांच्या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्य बिघडू शकते. याच कारणास्तव हिरड्यांची समस्या उद्भवू शकते. जसे की, हिरड्यांमध्ये सूज, दुखणे. परंतु कमी प्रमाणात याचे सेवन केल्याने कॅव्हिटीच्या समस्येपासून दूर राहू शकता.


हेही वाचा- लाल तिखटाचा अतिवापर ठरू शकतो घातक

- Advertisment -

Manini