Wednesday, May 8, 2024
घरमानिनीRelationshipLove Marriage नंतरही महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?

Love Marriage नंतरही महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?

Subscribe

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असते. काही वेळेस असे करण्यासाठी परिवाराशी भांडण ही करतात. तर काही प्रकरणात घरातील मंडळी आनंदाने लव्ह मॅरेजला परवानी देतात. तर सध्याच्या काळात लव्ह मॅरेज करणे सोप्पे जरी असले सत्य परिस्थिती बहुतांश ठिकाणी वेगळी आहे.

रिलेशिपमध्ये असताना पार्टनरशी वाद, भांडण, रडणे-हसणे अशा सर्व गोष्टी होत राहतात. परंतु जेव्हा नात्यात तिसरा व्यक्ती येतो तेव्हा काही गोष्टी बदलल्या जातात. तिसऱ्या व्यक्तीला आपल्या रिलेशनशिपमध्ये घेऊन येण्यासाठी जबाबदार हा नवरा किंवा बायको सुद्धा असू शकते. आपल्या लग्नामुळे नाखुश असल्याने ते एक्स्ट्रा मॅरिटलचा पर्याय निवडतात.

- Advertisement -

-दबावाखाली येऊन लग्न करणे
केवळ अरेंज मॅरेज मध्येच नव्हे तर काही लोक लव्ह मॅरेज सुद्धा दबावाखाली येऊन करतात. हा दबाव जास्तकरुन पार्टनर कडून टाकला जातो. अशातच व्यक्ती मानसिक रुपात लग्नाची जबाबदारी उलचण्यास तयार नसतो. त्याचसोबत वेळेसह त्याला काही शिकण्याची अपेक्षा फार कमी होते. त्यामुळे लग्न हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडली जातात.

-घरात वाढते वाद, भांडण
लग्नानंतर बहुतांश नवरा-बायको किंवा परिवारात मतभेदाची स्थिती निर्माण होतेच. काही वेळेस त्यांना नक्की कोणाची बाजू घ्यायची हे कळत नाही. अशाच स्थितीत पसंदीच्या मुलाशी लग्न केले तर अधिकच पंचायत होऊन बसते. कारण त्या महिलेला तुझ्या पसंदीच्या मुलाशी लग्न केलयं म्हणत टोमणे मारले जातात. दुसऱ्या बाजूला प्रियकर झालेला नवरा ही या गोष्टीला वैतागतो. या कचाट्यात अडकलेला व्यक्ती अशा सर्व गोष्टींपासून दूर जाण्यासाठी काही वेळेस परक्या पुरुषासह रिलेशनशिप मध्ये येतात.

- Advertisement -

-नात्यात कंटाळा येणे
लग्नाच्या आधीपासून रिलेशनशिपमध्ये असल्याने नाते जसं जसे पुढे जाते तेव्हा काहींना नाते बोरिंग वाटू लागते. नवरा-बायकोला सर्व गोष्टी एकमेकांच्या माहिती असतात. त्यांना फारसे काही करावे लागत नाही. अशातच काही महिला आपल्याला पार्टनर आधीसारखा खुश ठेवत नाही म्हणून  नात्यात गोडवा असावा म्हणून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा पर्याय निवडतात.

-नात्यात झालेले बदल सांभाळता न येणे
प्रत्येक प्रेयसी-प्रियकर लग्नापूर्वी एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. मात्र जेव्हा लग्न करतात तेव्हा स्थिती बदलेली असते. काही जबाबदाऱ्या अंगावर पडतात. अशातच एकमेकांसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने वाद होऊ लागतात. मतभेद होतात आणि यालाच कंटाळून महिला या एखाद्या परकीय पुरुष आपल्याला सुख देईल असा विचार करतात आणि यामधून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु होते.


हेही वाचा- तुमचं प्रेम खरं की खोटं कसं ओळखाल?

- Advertisment -

Manini