Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRelationshipएक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची 'ही' असू शकतात कारणे

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची ‘ही’ असू शकतात कारणे

Subscribe

लग्नाचे नाते पवित्र मानले जाते. त्यावेळी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचन घेतली-दिली जातात. अशातच जेव्हा नात्यात तिसरी व्यक्ती एन्ट्री करते तेव्हा मात्र प्रॉब्लेम्स वाढण्यास सुरुवात होते. वाद होतात किंवा तिसऱ्या व्यक्तीवरुन एकमेकांना वाट्टेल ते बोलून दाखवले जाते. (Extramarital affairs reasons)

अलीकडल्या काळात एक्स्ट्रा मॅरिटल अफेरची प्रकरणे अधिक वाढू लागली आहेत. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास तर एखादा पुरुष किंवा स्री आपल्या पार्टनर व्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीवर प्रेम करतो अथवा त्याच्या सोबत फिजिकल, भावनात्मक, मानसिक रुपात संबंध ठेवतो. त्यालाच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असे म्हटले जाते. याची नक्की कारणं काय असू शकतात याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

- Advertisement -

-जबरदस्ती लग्न करणे
असे बहुतांशवेळा अरेंज मॅरेज मध्ये होते. परिवारातील मंडळींच्या दबाखाली येत लग्न केल्याने सुद्धा एक्स मॅरिटल अफेअरचे प्रकरण तयार होऊ शकते. अशा प्रकारच्या नात्यात बांधली जाणारी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीला पार्टनरच्या रुपात पाहतो. खरंतर परिवाराच्या दबावामुळे लग्न केल्याने ते मूळ पार्टनरसोबत पटवून घेत नाहीत.

-घाईत लग्न करणे
कमी वयात लग्न करणे किंवा पार्टनर मिळाला म्हणून लगेच लग्न करणे अशा काही कारणास्तव एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकते. पार्टनरला व्यवस्थितीतपणे जाणून न घेत त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र हळूहळू जेव्हा पार्टनर नक्की कसा आहे हे कळल्यानंतर नात्यात फूट पडण्यास सुरुवात होते. अशी अनेक कारणे आहेत जी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी कारणीभूत ठरतात.

- Advertisement -

-आयुष्यातील प्राथमिकता
आयुष्यातील प्राथमिकता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकता. याचा परिणाम वैवाहिक आयुष्यावर ही होऊ शकतो. प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन असतो. अशातच एकमेकांबद्दल ताळमेळ बसणे थोडेसे कठीण होते. मात्र नात्याची घडी बसली नाही आणि त्यामधून अधिक वाद झाल्यास एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे प्रकरण तयार होऊ शकते.

-आर्थिक तंगी
पैशांच्या तंगीमुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिट अफेअर होऊ शकते. जर पार्टनर आर्थिक रुपात आपल्या पार्टनरच्या गरजा पूर्ण करू शकत नाही तर नात्यात वाद वाढू शकतात. याच कारणास्तव पार्टनरबद्दल विविध प्रकारे विचार केला जातो. अशातच दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातो जो आर्थिक गरजा पूर्ण करु शकतो.


हेही वाचा- समोरची व्यक्ती खोटं बोलतेय कसे ओळखाल?

- Advertisment -

Manini