घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना...

Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

Subscribe

Sharad Pawar : पुण्यात उद्योगपतीच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या नेत्यांकडून अनेक चर्चा होताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांना पत्रकार परिषदेत पुण्यातील गुप्त भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी “मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. (Sharad Pawar Will not comment on small people Commenting on that offer while targeting Ajit Pawar)

हेही वाचा – harad Pawar : भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न; शरद पवारांनी सांगितली रणनीती

- Advertisement -

पुण्यातील काका-पुतण्यांची भेट ही कौटुंबिक होती असं शरद पवार वारंवार सांगत आहेत. पण तरी सुद्धा यासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आले की, या भेटीची माहिती माध्यमांपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली? त्याचा हेतू काय होता? या प्रश्नांवर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी अतुल चोरडिया यांच्या घरी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरुन गेलो. माझ्या गाडीची काचही खालीच होती. त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर मी बुकेही स्विकारला. हे सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिलं. माझ्या स्वागतानिमित्त दिलेली फुलं मी स्विकारली आणि मी पुढे गेलो त्यामुळं मला कोणाची भीती असण्याचं कारण नाही, असं शरद पवार म्हणाले.

लहान लोकांवर मी भाष्य करणार नाही

याचवेळी त्यांना अजित पवार चोरडिया यांच्या घरी गुप्त पद्धतीने का दाखल झाले असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, कोण कशा पद्धतीनं आलं यावर मी काही बोलणार नाही. कारण मी फक्त माझ्या पुरतं सांगू शकतो. बाकी लहान लोकांवर मी भाष्य करणार नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर एकप्रकारे निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – पवार मोठेच नेते, त्यांना कुणीही ऑफर देऊ शकतो; शरद पवारांबाबत कुणी म्हटले असे? वाचा-

केंद्रातील कृषीमंत्रीपदाच्या ऑफरवर शरद पवार म्हणाले…

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना कृषीमंत्रीपद आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद आणि इतर काही ऑफर अजित पवारांद्वारे देण्यात आल्याचा दावा केला होता. यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, कोणी काय विधान केलं हे मला माहित नाही. पण आमच्या झालेल्या गुप्त बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. कारण आमच्यात फक्त भेट झाली होती. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझा सल्ला घेण्याची पद्धत आमच्या परिवारात आहे. त्यामुळे आमच्यात झालेल्या भेटीतून गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -