घरदेश-विदेशपंतप्रधानाच्या घोषणेनंतर 24 तासांच्या आत विश्वकर्मा योजनेला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदे, वाचा-

पंतप्रधानाच्या घोषणेनंतर 24 तासांच्या आत विश्वकर्मा योजनेला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदे, वाचा-

Subscribe

पंतप्रधान सत्तेवर आल्यापासून लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात ते देशवासीयांना उद्देशून काहींना काही आवाहन करत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कामगार आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना आणणार असल्याची घोषणा केली होती. या भाषणाच्या अवघ्या 24 तासाच्या आत आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून, ही योजना पंतप्रधान ‘विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ किंवा ‘पंतप्रधान विकास योजना या नावाने सप्टेंबर महिन्यापासून देशभर लागू होणार आहे. या विश्वकर्मा योजनेमध्ये 13 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.(Vishwakarma scheme green lighted within 24 hours of PM’s announcement Who will benefit read)

पंतप्रधान सत्तेवर आल्यापासून लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात ते देशवासीयांना उद्देशून काहींना काही आवाहन करत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. 15 ऑगस्टच्या भाषणातही त्यांनी देशवासीयांना भविष्यातील विविध स्वप्न दाखवली असून, या दरम्यान मात्र त्यांनी देशातील कारागीर आणि कामगारांसाठी विश्वकर्मा योजना आणून लहानातील लहान कुशल कारागिरांचा आर्थिक विकास कसा केला जाईल यावर भर देणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या भाषणाच्या 24 तासात मात्र, या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला असल्याने आता ही योजना लागू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisement -

विश्वकर्मा जयंतीला होणार योजना लागू

17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा पूजेच्या मुहूर्तावर ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्यात येणार आहे. हाच दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत केवळ आर्थिक मदतच नाही तर प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानाबद्दल सांगणे, ब्रँड्सची जाहिरात, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठांशी संपर्क, डिजिटल पेमेंट आणि सामाजिक सुरक्षा यांचाही समावेश असणार आहे.

हेही वाचा : निवडणुकीत उमेदवाराने संपत्ती जाहीर न केल्यास ठरणार अपात्र, ‘या’ न्यायालयाने दिला निर्णय

- Advertisement -

विश्वकर्मा योजनेचा यांना मिळणार लाभ

या योजनेचा सर्वाधिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला आणि दुर्बल घटकांना फायदा होणार आहे. यामध्ये सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : ‘पंतप्रधान नाही तर हिंदू म्हणून आलोय’; ऋषी सुनक पोहोचले मोरारी बापूंच्या रामकथेला

ही आहेत विश्वकर्मा योजनेचे वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत नवीन कौशल्ये, साधने, क्रेडिट सपोर्ट आणि मार्केट सपोर्ट दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे. आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15 हजार रुपयांची मदत देणार आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. यावर कमाल पाच टक्के व्याज असणार आहे. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -